महाराष्ट्र

सेप्टीक टँकची सफाई करताना 5 कामगारांचा मृत्यू…

सेप्टीक टँकची सफाई करण्यासाठी उतरलेल्या पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. यात एक जण गंभीर असून गुरूवारी रात्री ही घटना घडली.

परभणी जिल्ह्यात सोनपेठमधील भाऊचा तांडा शिवारात हा प्रकार घडला. तीन दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सेप्टीक टँकमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता.

नक्की काय घडले?

परभणीत सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा या शिवारातील ही घटना घडली. एका शेतातील घराच्या सेफ्टीक टॅंक स्वच्छ करण्याचे कंत्राट परभणी आणि सोनपेठ मधील काही कामगारांनी घेतले होते. काल (11 मे) रात्री शेख सादेक, शेख जुनेद, शेख शाहरूख, शेख नवीद, शेख फेरोज, शेख साबेर हे सहा जण सेफ्टीक टॅंक स्वच्छ करत होते. दरम्यान, स्वच्छतेचे काम सुरु असताना कामगार गुरमरले की स्वच्छता करणाऱ्या मशीनचा त्यांना शॉक लागला हे कळू शकले नाही.

मात्र, या अपघातात शेख सादेक, शेख जुनेद,शेख शाहरूख,शेख नवीद, शेख फेरोज या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेख साबेर हे अत्यवस्थ असल्याने त्यांना तात्काळ परळी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर मृत पाचही जणांचे मृतदेह हे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login