सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर धार्मिकसोलापूर सामाजिक

जरिया फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम, प्रणिती शिंदेंनी शुभेच्छा देत केलं कौतुक…

जरिया फाउंडेशनच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे, ज्याची सध्या शहरात चर्चा आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून १५० ते २०० लोकांना अजमेरचे सुप्रसिद्ध सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांची दर्शन यात्रा घडवण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे संस्थापक नजीब शेख यांनी केल आहे. यावेळी एक विशेष बाब म्हणजे सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नावे ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर चादर चढवली जाणार आहे.

अजमेरच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनी आज खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेतली. प्रणिती यांनी भाविकांना शुभेच्छा देत या यात्रेला पाठिंबा दर्शवला. याशिवाय, प्रणिती शिंदेंनी चादरीला स्पर्श करून आपली भक्तीही व्यक्त केली. मुस्लिम समाजामध्ये हज आणि उमरा यात्रेला विशेष महत्त्व आहे. तसेच अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज यांचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांमध्ये मोठा उत्साह असतो. याच भावनेला प्रोत्साहन देत नजीब शेख यांनी ३० जानेवारी रोजी १५० ते २०० भाविकांना अजमेरला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनीही यात्रेच्या आयोजक आणि भाविकांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी भाविकांना ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर जाऊन आपल्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केल. यात्रेचा संपूर्ण खर्च जरिया फाउंडेशनकडून केला जाणार असून, दर्शन यात्रेसाठी ३० जानेवारीला जाणारे भाविक ६ फेब्रुवारीपर्यंत अजमेरला राहील. दरम्यान, हा उपक्रम भाविकांमध्ये आध्यात्मिकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia