सोलापूर क्राईममहाराष्ट्रसोलापूर बातमी

सोलापुरात भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून; 70 फूट रोड परिसरात खळबळ…

सोलापूर : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील 70 फूट रोड परिसरात रविवारी सकाळच्या सुमारास एका तरुणाचा भर दिवसा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरेश कृष्णा श्रीराम (वय अंदाजे 35) या तरुणावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर करत त्याच्यावर सपासप वार केले तसेच डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. हा प्रकार भर रस्त्यावर घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून मृतदेह पुढील तपासासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी कोण आहेत आणि खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर 70 फूट रोड परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. या घटनेमुळे सोलापूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)