सोलापूर अपघातमहाराष्ट्रसोलापूर बातमी

सोलापुरात मध्यरात्री भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी…

सोलापूरमधील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.सोलापूर पुणे रोड डी-मार्ट जवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या इर्टिगा कारने रस्त्यावर थांबलेल्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघे जखमी आहेत…

सोलापूर शहरातील पुणे नाका ते मार्केट यार्ड मार्गावर, 7 मे 2026 रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. डी-मार्टपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर मार्केट यार्डच्या दिशेने निघालेल्या भरधाव इर्टिगा कारने (क्रमांक MH १३ EK ७२०१) रस्त्यावर थांबलेल्या अयचर वाहनाला (क्रमांक MH १३ CU ८६९९) पाठीमागून जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की, इर्टिगा कार सुमारे दीडशे फूट फरफटत गेली आणि कारचे संपूर्ण छत कापून बाजूला निघून पडले
या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात शेखर सुरेकर (वय ३३, रा. कुमठा नाका, सोलापूर) अमोल धैर्यशील येरटे (वय ४०, रा. दाळगे प्लॉट, भवानी पेठ, सोलापूर) कादर सैदू हांडे (वय ३३, रा. कुमठा नाका, सोलापूर) यांचा समावेश आहे. कादर सैदू हांडे यांचा उपचारादरम्यान एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

स्वरुप कोथींबीरे (वय २७, जुनी मिल चाळ, सोलापूर)
अमित राजेश जाधव (वय ३०, रा. पांडुरंग वस्ती, शास्त्री नगर, सोलापूर) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शेखर सुरेकर हे अविवाहित होते. ते एका खासगी फायनान्स कंपनीत काम करत होते. त्यांच्या पश्चात आई आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
अमोल धैर्यशील येरटे हे आदर्श सुझुकी, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे सिनिअर मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
कादर सैदू हांडे हे आदर्श सुझुकी, अक्कलकोट रोड येथे मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
पोलिसांनी अपघाताचे कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास सुरू केला आहे…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel