सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

मातोश्री विद्यालय म्हैसगांव येथे वार्षिक पारितोषिक वितरण व दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न…

सद्संकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर संचलित मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव येथे वार्षिक पारितोषक वितरण व इयत्ता दहावीच्या वर्गाचा शुभेच्छा समारंभ उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्संकल्प शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठलरावजी शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन (भाऊ) उबाळे,म्हैसगांवचे सरप सतीश (अण्णा) उबाळे ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, प्रगतशील बागायतदार अनिल तात्या खारे बबनराव शिंदे शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल जानराव हे होते.
.यावेळी संविधान गौरव शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप तसेच विविध स्पर्धांमध्ये व परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्रांचे वाटप अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करून दीपस्तंभ वार्षिक अंक 2025चे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील आदर्श विद्यार्थिनी कु.स्नेहल कांतीलाल नरूटे व कु संस्कृती संतोष वाघमारे यांनी व्यक्त केलेल्या मनोगताने उपस्थितांचे मने जिंकली.

यावेळी बोलताना वामन भाऊ उबाळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिक्षणाबरोबर सुसंस्कारित पिढी घडविण्याचे आदर्शवत काम आपण करावे असे आवाहन केले. तर संस्थेचे संस्थापक सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाऊन यश संपादन करायचे असते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक विनोद वर यांनी केले, सूत्रसंचालन श्रीमती प्रतिभा पांडव यांनी केले तर शेवटी सर्वांचे आभार भारत कापरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशिलचंद्र भालशंकर , संजय गायकवाड ,रमेश बनसोडे ,माधव माने, अशोक कांबळे यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गीताने करण्यात आली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia