राजकीय

सोलापूरमध्ये भाजपच्या इच्छुकांची भाऊगर्दी

दररोज नवीन उमेदवाराची चर्चा

सोलापूर राखीव मतदारसंघात भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. संभाव्य उमेदवार म्हणून दररोज नवनवीन नावांची भर पडत आहे. यातून उमेदवारी माळ नेमक्या कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता वरचेवर ताणली जात आहे.

विद्यमान खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांचा अनुसूचित जातीचा दाखला बनावट असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा सध्या प्रलंबित आहे. जात प्रम ाणपत्र प्रकरणही उच्च न्यायालयात न्यायप्रवीष्ट आहे. मात्र तरीही ते पुन्हा खासदारकीसाठी पुन्हा इच्छूक आहेत. माजी खासदार शरद बनसोडे हे सुध्दा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हवाला देत रिंगणात उतरले आहेत.

माळशिरसचे आमदार राम सातपुते, माजी खासदार अमर साबळे, सनदी अधिकारी भारत वाघमारे, माजी नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे, माजी नगरसेविका संगीता जाधव यांच्यासह इच्छुकांची संख्या जवळपास पंचवीसपर्यंत गेली असून इच्छुकांच्या यादीत दररोज नव्या नावांची भर पडत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी सांगितले आहे की, भाजपने सोलापूरच्या उमेदवारीसाठी विचारणा केली असून त्यादृष्टीने मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही बोलणी झाली आहे. मुख्यमंत्री सकारात्मक असून भाजपा काय तो निर्णय घेणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे यांचेही नाव चर्चेत आले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

508 Insufficient Resource

The website is temporarily unable to service your request as it exceeded resouce limit. Please try again later.