राजकीय

महाविकास आघाडीतूनच अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न -c

गेल्या 2 वर्षांपासून अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे काम विरोधक करत नाहीयेत तर त्यांच्याच पक्षातील नेते, महाविकास आघाडीतच असे प्रयत्न सुरु असल्याचा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजित पवारांनी भाजपशी कुठलाही संपर्क केलेला नाही. वा भाजपने त्यांना संपर्क केला नाही. भाजपमध्ये अशी कोणतीही चर्चा नाही. अजित पवार यांचे विरोधक अशा बातम्या तयार करत असतील, तयांची बदनामी कोण करत आहे हे त्यांनीच पाहावे, असे म्हणत बावनकुळे यांनी स्प्ष्टीकरण दिले आहे.

भाजपशी संपर्क केलेला नाही

अजित पवारांच्या भाजप प्रवेशावरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलेले आहे. काल खुद्द अजित पवार यांनीच आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अजित पवारांनी भाजपशी संपर्क केलेला नसल्याचे सांगितले आहे.

आरोप करणे विरोधकांचे काम

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावरुन विरोधक मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे लोक जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गिरीश महाजन, तानाजी सावंत यांचे याठिकाणी लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसतानाही ते या प्रकरणावर लक्ष ठेवून ठेवत आहेत. विरोधकांना आरोप करायला काय लागत नाही. आरोप करणे, हे त्यांचे काम आहे.

बातम्यांना सुरुवात कुठून झाली?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जी बाब घडलेलीच नाही. त्याबाबत चुकीची माहिती देऊ नये. कल्पोकल्पित बातम्या देऊ नये. शरद पवारांकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत गेल्यानंतरच अजित पवारांबाबत या बातम्यांना सुरुवात झाली. याबाबत अजित पवारांनीच काल सांगितले. गेल्या 2 वर्षात अजित दादांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न कोण उपस्थित करत आहे. हे त्यांनीच पाहावे, असेही बावनकुळे म्हणाले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

508 Insufficient Resource

The website is temporarily unable to service your request as it exceeded resouce limit. Please try again later.