जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरमहाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर बातमीसोलापूर राजकीय

सोलापूरचे काही नुकसान झाल्यास सातपुते जबाबदार;प्रहार संघटना आक्रमक

सोलापूर:प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत राम सातपुते याना इशारा दिला आहे.भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी लोकसभा निवडणुकीत विकासावर बोलावं आणि सोलापूरचा विकास करावं.जाती जाती मध्ये तेढ निर्माण करण्यासारख वक्तव्य करू नये.सोलापूरकगे काही नुकसान झाल्यास राम सातपुतेच जबाबदार असतील,प्रशासनाने याची दखल घ्यावी,निवडणूक अधिकाऱ्यांनी ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली आहे.राम सातपुते यांनी दोनच दिवसांपूर्वी असे वक्तव्य केले होते,मशिदींमधून काँग्रेसचा प्रचार केला जात आहे.सातपुते यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी निवडणूक आयोगाला द्यावे,बेताल वक्तव्य करू नये असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेच्या अजित कुलकर्णी,जमीर शेख,खालिद मणियार यांनी दिला आहे.

*नेमकं प्रकरण काय झालं?-
सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी रविवारी माध्यमांना माहिती देताना,एमआयएमवर निशाणा साधत मशिदीं बाबत वक्तव्य केले होते.एमआयएमने काँग्रेसला छुपा पाठिंबा दिला आहे.मशिदींमधून काही मौलवी लोक मोदींना हरविण्यासाठी काँग्रेसचा प्रचार करत आहेत.त्याचा मी निषेध करतो.राम सातपुते यांच्या या वक्तव्याचे मुस्लिम समाज विरोध करत आहेत त्यात महायुतीच घटक पक्ष असलेल्या प्रहारने उडी घेत राम सातपुते याना इशारा दिला आहे.

*सोलापूरच काही नुकसान झाल्यास राम सातपुते जबाबदार-
सोलापुरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्राचारामुळे सोलापूर ढवळून निघाले आहे.राम सातपुते यांनी केलेल्या वक्तव्याला प्रहारच्या वतीने कडाडून विरोध करत,राम सातपुते तुम्ही तर बीडचे आहात,सोलापूर आमचं आहे,सोलापूरचे काही नुकसान झाल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल ,प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत कारवाई करावी.राम सातपुते अशा प्रकारे प्रचार करत राहिले तर प्रहार शेतकरी संघटना आचारसंहिता काळात अचानकपणे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel