राजकीय

Solapur : सुशीलकुमार शिंदे शिवसेनेला मदत करतील, हा विश्वास ठेवायचा कसा ?’ माजी मंत्री खंदारे यांचा सवाल

सोलापूर (प्रतिनिधि) :- शिवसेनेशी आघाडी करण्यास नकारघंटा हायकमांडला कळविणारे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आणि सुनील प्रभू यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी अनुपस्थित राहिलेल्या आमदार प्रणिती शिंदे हे आगामी निवडणुकीत शिवसेनेला मदत करतील, यावर आम्ही विश्वास ठेवायचा कसा ?, असा सवाल विचारत कट्टर शिवसैनिक असणारे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी उपस्थित केला. त्यामुळे सोलापुरात काँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढलेली आहे…. काहीही करून तीन निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचापा काढण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांची कन्या असणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा मतदारसंघात विविध गावात भेटीगाठी आणि सभा कॉर्नर मिटिंग यावर भर दिला असला तरी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील माजी मंत्र्यांनीच अनेक प्रश्न उपस्थित केले आहे

महाविकास आघाडी प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापुरात मेळावा घेऊन काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दर्शविण्यात आला. मात्र, तत्पूर्वी विधानसभा, लोकसभा आणि इतर निवडणुकांबाबतही शब्द देण्याचा आग्रह शिवसेना नेत्यांनी धरला, त्यामुळे बैठकीत काही वेळ वातावरण गरम झाले होते. त्यासंदर्भात बोलताना शिवसेनेचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी काँग्रेस आणि शिंदेंचे अनुभव कथन केले.

महाविकास आघाडी स्थापन करण्यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी माजी मुख्यमंत्री असणारे सुशीलकुमार शिंदे यांनी नकार दर्शविला होता. तसेच, महाविकास आघाडी म्हणून काम करत असतानाही अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही प्रणिती शिंदे गैरहजर राहिल्या होत्या, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ते शिवसेनेला मदत करतील का?, असा सवाल खंदारे यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडी स्थापन करण्यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी नकार दर्शविला होता. तसेच, महाविकास आघाडी म्हणून काम करत असतानाही अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही प्रणिती शिंदे गैरहजर राहिल्या होत्या, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ते शिवसेनेला मदत करतील का?, असा सवाल खंदारे यांनी उपस्थित केला.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी दक्षिण सोलापूर मतदारसंघासाठी काँग्रेस आम्हाला मदत करणार का? की लोकसभेला पडलेल्या मतदानांचा दाखला देत दक्षिण सोलापूर मतदारसंघावर दावा करणार. इतर जागांबाबतही काँग्रेस सबुरीचे धोरण घेणार की मागच्या प्रमाणेच पुढेही तसेच अनुभव येणार, असा प्रश्नही माजी मंत्री खंदारे यांनी केला.

मेळावा घेण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीने एक स्ट्रॅटेजी ठरवण्यात आली होती. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला काँग्रेस मदत करणार का? महापालिका, नगरपालिका आणि इतर निवडणुकांत काँग्रेसचे धोरण काय असणार? आगामी काळात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना खासदार फंडातून विकासकामांसाठी निधी मिळणार का? , अशी बांधणी करून घ्यायचे ठरविले होते.

एकंदरीत सन 2024 ची लोकसभा निवडणूक ही सोपी नसली तरी ही जिंकण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी फील्डिंग लावली आहे… काँग्रेस पक्षाचा सन 2014 आणि 2019 चा झालेला पराभव हे अद्यापही शिंदे कुटुंबीयांनी विसरलेले नाही… त्यामुळे ही निवडणूक मोठ्या ताकतीने लढून जिंकण्यासाठी त्यांनी प्राणप्रतिष्ठा पणाला लावली आहे….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel