महाराष्ट्र

मॅक्सवेलनंतर आता ट्रॅव्हिस हेडही झाला भारताचा जावई? या भारतीय मॉडेलने बांधली लग्नगाठ

Bengali Model Fantasy Wedding With Travis Head : वर्ल्ड कपच्या अंतीम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराव करत विश्वचषक त्यांच्या नावावर केला. यंदाच्या वर्ल्डकपची भारतीयांना खूप अपेक्षा होती की यंदाचा वर्ल्ड कप हे आपल्यालाच मिळणार.

पण असं होऊ शकलं नाही. या सामन्यात सगळ्यांचं लक्ष हे सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनं वेधलं कारण त्यानं या सामन्यात शतक केलं. त्यानंतर सगळे ट्रॅव्हिस हेडनंची स्तुती करत होते. या सगळ्यात असं काही झालं आहे जे पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. बंगाली मॉडेल हेमोश्री भद्रानं ट्रॅविस हेडशी लग्न केलं आहे. त्याचा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला असून तो चर्चेचा विषय ठरला आहे.

हेमोश्री भद्रानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हेमोश्रीनं ट्रॅव्हिस हेडच्या नावाचं कुंक कपाळी लावलं आहे. या व्हिडीओत हेमोश्री तिच्या कुटुंबातील काही लोकांसोबत दिसत आहे. या व्हिडीओत हेमोश्री म्हणाली की ‘मी हेडच्या नावाचं कुंकू कपाळी लावलं आहे. त्याच्या मी जितका विचार करते तितकी माझ्या चेहऱ्यावरील लाली वाढते. माझ्या सुंदर हातात त्याचा फोटो घेतला आहे. हे माझी पती झाले तर..?’ असं हेमोश्री म्हणते आणि त्यानंतर बंगाली लग्न सोहळ्यात वाजणारं पारंपारिक संगीत तिच्या मागे असलेल्या महिला तो आवज काढतात. हा व्हिडीओ शेअर करत हेमोश्रीनं कॅप्शन दिलं की ‘हे माझे पती झाले तर..? मला तुझ्याशी लग्न करायचंय. तुझ्या कौशल्यानं आणि प्रतिभेनं माझं मन जिंकलं. ट्रॅव्हिस हेड आय लव्ह यू…’

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login