महाराष्ट्र

Asaduddin Owaisi : सीएम योगींनी प्रचारात केली हैदराबादचे नाव बदलण्याची घोषणा ; असदुद्दीन ओवेसी म्हणाले,”तुमचे स्वप्न.”

Asaduddin Owaisi : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असताना त्यांनी तेलंगणात रोड शो केला. दरम्यान या रोड शो दरम्यान हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्याची मोठी घोषणा केली होती.

यावर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. आहे.

मुख्यमंत्री योगींनी प्रचारात मोठी घोषणा करत हैद्राबादचे नाव बदलून भाग्यनगर करणार असल्याचे म्हटले. त्यांच्या या घोषणेला एका जाहीर सभेला संबोधित करताना असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर दिले. ते म्हणाले,”आज आपण पाहत आहोत की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येथे आले आहेत. त्यांचा पेटंट डायलॉग आहे की आम्ही नाव बदलू, त्यांच्याकडून दुसरे काही येत नाही.” , “अरे भाऊ! तुम्ही हैदराबादचे नाव बदलू शकत नाही. तुमचे स्वप्न स्वप्नच राहील.” ते म्हणाले की, अमित शहा बोलत आहेत. मी आरक्षण रद्द करीन. तुम्ही मलकपेठेत हरत आहात, आधी इथे येऊन बघा” असे म्हटले.

 

 

 

तत्पूर्वी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणातील मेहबूब नगर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्तेत आल्यास मेहबूब नगरचे नाव बदलून पलामुरू करण्यात येईल” असे त्यांनी म्हटले.

यानंतर सीएम योगी यांनी कुमारम भीम आसिफाबाद जिल्ह्यात जाहीर सभाही घेतली, जिथे त्यांनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्याची घोषणा केली. तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला राज्यातील विधानसभेच्या 119 जागांसाठी मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login