महाराष्ट्रक्राईम

आईनेच मुलीचा गळा दाबून केला खून:अनैतिक संबंधात अडथळा असल्याने प्रियकराच्या मदतीने पुण्यात हत्या

अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने आईने प्रियकराच्या मदतीने मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेच्या तपासानंतर मुलीच्या आईसह प्रियकरास पोलिसांनी अटक केली आहे. खडकी पोलिसांना तीन दिवसांपूर्वी तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. गावातून पुण्यास पळून जाताना रेल्वेप्रवासातच मुलीला गळा दाबून संपवल्याचे पोलिसांच्या तपासाअंती स्पष्ट झाले आहे.

लक्ष्मी संताेष गवई (वय-26) व संताेष देवमन जामनिक (वय-25, दाेघे रा.खेरपुडी, ता.बाळापूर, जि.अकाेला) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सदर दाेन्ही आराेपींवर खडकी पाेलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

दाेन मार्च राेजी पाेलिसांना खडकी रेल्वे स्टेशन ते खडबी बाजार यादरम्यानच्या रस्त्यावर सीएफडी मैदानाजवळ तीन वर्षाचा मुलीचा मृतदेह आढळून आला हाेता. हा मृतदेह पाेलिसांनी ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. डाॅक्टरांच्या अहवालानुसार मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

सीसीटीव्हीत मिळाले आरोपी

मुलगी अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. पुणे- मुंबई जुन्या महामार्गावर पाेलिसांना एका दुकानात आराेपींबाबत सीसीटीव्ही फूटेज मिळाले. त्यानुसार एक जाेडपे सीसीटीव्हीत कैद झाले हाेते. महिलेच्या कडेवर संबंधित मुलगी हाेती आणि ते खडकी रेल्वे स्टेशन मधून बाहेर पडत हाेते. हे जोडपे अकोल्यातून आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रेल्वे प्रवासातच मुलीचा खून

आरोपी लक्ष्मी व संताेष हे अकाेला जिल्हयातील एकाच गावचे रहिवासी असून त्यांच्यात अनैतिक संबंध होते. गाव साेडून पुण्यास जाण्याचे त्यांनी ठरवले हाेते. एक मार्च राेजी ते गावातून पुण्यास येण्याकरता निघाले. परंतु, लक्ष्मीने येताना तिच्या साेबत तीन वर्षाची मुलगी आणल्याने रेल्वे प्रवासात त्यांच्यात भांडणे झाली. आराेपीने त्यावेळी मुलीस पट्टयाने मारहाण करत तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर खडकी रेल्वे स्टेशन जवळील माेकळया मैदानात जाऊन मुलीचा मृतदेह टाकून ते पसार झाले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login