सोलापूर राजकीय

सोलापूर शहरातील हातपंप बंद असल्याने काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन..

सोलापूर (प्रतिनिधि):- सोलापूर शहराला सध्या चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे त्यातच महापालिकेच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने पाणी पुरवठा आणखी एक दिवस पुढे गेला आहे, त्यामुळे नागरिकांनी महापालिका प्रशासन विरोधात रोष व्यक्त केला आहे, लिमयेवाडी सह शहरातील अनेक भागातील हातपंप बंद अवस्थेतआहेत, वारंवार प्रशासनाला कळवून देखील हातपंप दुरुस्त केले जात नाही, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पाण्याचा वापर जास्त होतो, परंतु नळाला पाणी नाही हातपंपाला पाणी नाही मग आम्ही जायचे कुठे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत, दरम्यान काँग्रेस डी ब्लॉक अध्यक्ष देवभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लिमयेवाडी परिसरात बंद पडलेल्या हातपंपाला हार घालून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले

प्रशासनाने बंद पडलेले हातपंप लवकरात लवकर दुरुस्त करावे अन्यथा महापालिका गेटसमोर आंदोलन करू असा इशारा देवा गायकवाड यांच्यसह या भागातील नागरिकांनी दिला

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel