महाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर बातमीसोलापूर राजकीय

सोलापूर:काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी मशिदींमधून फतवे निघत आहेत;राम सातपुतेंचा दावा

एमआयएमने उमेदवार न देऊन काँग्रेसला अप्रत्यक्ष पाठिंबा दिलाय;मौलवी लोक मशिदींमधून काँग्रेसचा प्रचार करतायत

सोलापूर:सोलापूर लोकसभेचच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी संताप व्यक्त केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रचार केला जात आहे.मशिदीं मधून मुल्ला मौलवी प्रचार करत आहेत ,असा दावा भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी केला आहे.राम सातपुते यांच्या या दाव्या मुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.काँग्रेसची मानसिकता ही जिहादी लोकांना सोबत घेण्याची राहिली आहे.एमआयएमने उमेदवार न दिल्याने मशिदीं मधून फतवे निघत आहेत.या फतव्याच्या विरोधात सर्व हिंदू समाज एकत्र होईन आणि नरेंद्र मोदी यांच्या मागे राहील असेही राम सातपुते यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

*एमआयएमने उमेदवार दिला नाही,अन् लोकशाही वाचवण्याचे आवाहन केले-
एमआयएमने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरात उमेदवार देणार नाही,लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती सोलापुरातील एमआयएम प्रमुख फारूक शाब्दी यांनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती.२०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एमआयएम आणि वंचित अशी युती असताना प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा निवडणुक लढवली होती.काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा 1 लाख 58 हजार मतांनी पराभव झाला होता.आणि भाजपचे डॉ जय सिद्धेश्वर महाराज यांचा विजय झाला होता.त्यावेळी प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमवर सर्वस्तरातून टीका झाली होती.एमआयएम याबी वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेसचा पराभव झाला होता.एमआयएमला भाजपची बी टीम अशी टीका देखील अनेकदा करण्यात आली होती.

*राम सातपुते यांचा दावा;मशिदींमधून फतवे निघत आहेत-
सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार राम सातपुते यांनी रविवारी दुपारी माध्यमांना माहिती देताना ,असा दावा केला आहे,एमआयएमने उमेदवार दिला नाही,म्हणजे त्यांचा अप्रत्यक्षपणे काँग्रेसला पाठिंबा आहे.तसेच मौलवी हे मोदीना हरविण्यासाठी मशिदीं मधून प्रचार करत आहेत,मशिदींमधून फतवे निघत आहेत.हे फतवे सोलापुरातील मशिदींमधून निघत आहेत,मी याचा निषेध करतो, उर्दू भाषेत वेगवेगळे पत्रके निघत आहेत,त्यामुळे राम सातपुते यांनी निषेध व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

508 Insufficient Resource

The website is temporarily unable to service your request as it exceeded resouce limit. Please try again later.