सोलापूर बातमी

सोलापूरच्या युवकांना माफक दरात चिंचोळी एम.आय.डि.सी.तील आय.टी. संकुल उपलब्ध करून द्या

सोलापूरातील आय.टी. क्षेत्रात कार्यरत उद्योगजकांची जिल्हा प्रशासनाला मागणी

सोलापूरात सुमारे ७८ लघु व मध्यम आकाराच्या नोंदणीकृत आय.टी. कंपन्यां कार्यरत असुन त्या सगळ्यांना एकत्रित एकाच छताखाली देशा विदेशात सेवा पुरवठा करण्यासाठी चिंचोळी एम.आय.डि.सी.तील सुमारे २३ वर्षांपूर्वी संपूर्ण बांधकाम करुन अद्यावत असे आय.टी. संकुल उपलब्ध आहे ज्याची कल्पना बहुतेक उद्योगजकांना नाही. सदर इमारत आय.टी. कंपन्यांच्या वापरण्यासाठी सोलापूरातील अनेक उद्योजकांनी मागणी केली, केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनकडे प्रस्ताव सादर केले, लालफितशाही आणि उद्योगजकांना न परवडेल असे भाडे, मुलभूत सुविधांच्या अभाव तथा राजकीय अनास्थेमुळे सदर इमारत गेल्या २३ वर्षांपासून धुळखात दयनीय आणि जिर्णास्थेत पडुन आहे. सदर इमारत अतिशय भव्य दिव्य असुन असुन, सदर इमारती मध्ये ४० कंपन्यां आणि त्यात ६०० कर्मचारी व्यवस्थित काम करु शकतील इतक्या भव्य परिसरात सदर इमारत उभी आहे, भविष्यात आणखीन काही मजले ह्या इमारतीत सहज बांधले जाऊ शकतील इतके भक्कम बांधकाम करण्यात आले आहे.

चिंचोळी एम.आय.डि.सी.तील आय.टी. संकुलातील इमारतीला केंद्र सरकारच्या वतीने एस.ई.झेड. दर्जा मिळुन देण्यासाठी नवनिर्वाचित खासदारांनी प्रयत्न करून सोलापूरच्या आय.टी. कंपन्यांना तीथे सबसिडायाईझ रेट मध्ये अॉफिस स्पेस, शुन्य ते जास्तीत जास्त ०५% जी.एस.टि. कर सवलत, सबसिडायाईझ वीज पुरवठा, सबसिडायाईझ हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन, मुकलक पाणी पुरवठा, महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षाव्यवस्था, सुयोग्य परिवहन व्यवस्था ह्या मुलभूत मागण्या सोलापूरातील आय.टी. क्षेत्रात कार्यरत उद्योजकांनी जिल्हा प्रशासनाला मागणी केली आहे. ह्या वेळी इम्मोर्टल कोड सॉफ्टवेअर सोल्युशन प्रा. लि. चे संचालक सारंग तारे, युवा उद्योगजक धनराज बगले, उद्योजक गणेश शिलेदार, उद्योजक अॅड. दत्तात्रय अंबुरे आणि गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी चिंचोळी एम.आय.डि.सी.तील आय.टी. संकुल परिसराची अभ्यासपूर्ण निरिक्षण करत पाहणी केली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel