सोलापूर बातमीशैक्षणिक

विद्यार्थ्यांनी कुटुंबाचा व राष्ट्राचा आधारस्तंभ म्हणून पुढे या: भालशंकर

आपल्या वृद्ध आई-वडिलांना चार दिवस सुखाचे दिवस दाखवावे, लहान भावंडाचे शिक्षण किंवा नोकरीमध्ये हातभार लावावा, आपलेही एखादे हक्काचे छोटेसे घर असावे, आपल्या कुटुंबाला अन्न मिळावे या गोष्टीसाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून आपल्या कुटुंबाचा आणि नंतर राष्ट्राचा आधारस्तंभ म्हणून पुढे यावे, असे आवाहन बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या मंगळवेढा तालुका यांच्यावतीने आयोजित केलेल्या श्री संत दामाजी महाविद्यालयात मंगळवेढा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच नवनिर्वाचित मुख्याध्यापक सन्मान सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून भालशंकर बोलत होते. याप्रसंगी वित्त व लेखा अधिकारी अजित शिंदे, मंगळवेढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे, माजी प्राचार्य डॉ. एन. बी. पवार, प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव, जि प अधिकारी अनिल पाटील, महासंघाचे सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, रमेश लोखंडे, रवी देवकर, मंगळवेढा तालुका अध्यक्ष विठ्ठल एकमल्ली,आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प, लेखणी आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी शासनाचे वित्त व लेखा अधिकारी अजित शिंदे म्हणाले की मंगळवेढा तालुक्यातून तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थी अधिकारी झालेले आहेत, यांचा आदर्श घेऊन उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या तालुक्याचे नावलौकिक आणखीन वाढवावे असे आवाहन केले.

गटशिक्षणाधिकारी विभीषण रणदिवे म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांनी महासंघाने दिलेल्या महापुरुषांच्या चरित्र पुस्तकांचे वाचन करून समोर आलेल्या संकटावर मात करून उज्वल यश मिळवावे, असे मत व्यक्त केले.

यानंतर मंगळवेढा तालुका सचिवपदी सिद्धेश्वर अवघडे यांची महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सिद्धेश्वर अवघडे यांनी यांनी केले तर मंगळवेढा तालुकाध्यक्ष विठ्ठल एकमल्ली यांनी आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवकुमार स्वामी, नितीन मोरे, खंडू कोकरे, सोमनाथ माळी, शंकर माळी, संदीप ढगे, शहाजी ढोबळे, दिलीप चंदनशिवे, महेंद्र शिंदे, रवींद्र वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia