सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

ब्रह्म प्रतिष्ठानच्या वधू – वर परिचय पुस्तिकेचे थाटात प्रकाशन

येथील ब्रह्म प्रतिष्ठान या संस्थेतर्फे काढण्यात आलेल्या वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन शिवशाहीमधील वरिष्ठ निवृत्त अधिकारी विलास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सुहास देशपांडे हे होते. यावेळी पुरोहित सप्रे गुरुजी, संस्थेच्या अध्यक्षा सुजाता देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना विलास कुलकर्णी यांनी मुला-मुलींच्या विवाहातील अडचणीचा ऊहापोह करीत ब्रह्म प्रतिष्ठानच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास देशपांडे यांनी विवाह जमण्यासाठी तडजोड ही महत्त्वाची असल्याचे सांगत मुलाकडच्या आणि मुलीकडच्यांनीही एक एक पाऊल मागे येऊन विवाह जमविणे महत्त्वाचे आहे. पुस्तक हे एक संपर्काचे साधन आहे त्याचा सर्वांनी लाभ घेऊन समाजातील विवाह इच्छुक युवक युवतींचे विवाह घडून यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
संस्थेचे कार्यकारणी सदस्य दत्ता आराध्ये यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या उपक्रमाची माहिती देत प्रतिष्ठानच्या गोशाळेला सर्वांनी भेट द्यावी असे आवाहन केले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी पांडुरंग देशपांडे, सुनील देशपांडे, भालचंद्र कुलकर्णी, भरत काटीकर, वामन कुलकर्णी, संजय पैठणकर श्रीकांत कुलकर्णी, पी.बी. कुलकर्णी आदींसह वधू – वरांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता आराध्ये यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर देगावकर यांनी मानले.
चौकट………
पुरोहितांचा आणि देणगीदारांचा सन्मान
ब्रह्म प्रतिष्ठानने या कार्यक्रमात ब्रह्म प्रतिष्ठानच्या विविध कार्यक्रमात पौरोहित्य करणारे सप्रे गुरुजी यांचा सन्मान केला. तसेच यावेळी संस्थेला देणगी देणारे पी.व्ही. कुलकर्णी आणि विलास कुलकर्णी तसेच द्वारकाधीश मंदिर चे व्यवस्थापक दत्तात्रय पाठक यांचाही सत्कार केला.
– – – – – – – – – – – – – – – – –
फोटो ओळी…………..
ब्रह्म प्रतिष्ठानतर्फे काढण्यात आलेल्या वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन विलास कुलकर्णी यांच्या हस्ते झाले त्यावेळी सुहास देशपांडे, सुजाता देशपांडे, दत्तात्रय आराध्ये, सप्रे गुरुजी, पांडुरंग देशपांडे आदिंसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login