सोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

शतकवीर डॉ नारायणराव दासरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

वैद्यकीय क्षेत्रात तब्बल सात दशकांहून अधिक काळ रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असणारे आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावं या उद्देशाने सत्तर पंच्याहत्तर वर्षापुर्वी सोलापूर तालुक्यातील बार्शी या गावातील वैरागच्या अविकसित भागात स्वतःचा वैद्यकीय सेवा केंद्र सुरू केले.वैराग ठिकाणी तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी रुग्णांची सेवा केली.डा.नारायणराव दासरी हे रुग्णांच्या सोयीसाठी वैराग येथे छोटेसे दवाखाना थाटला त्यातून अनेकांची सेवा केली.अशा डॉ नारायणराव दासरी यांचा काल बुधवारी शंभरावा वाढदिवस होता.या वाढदिवसाच्या निमित साधून दासरी कुटूंबातील नातू, नातवंडं आणि सूना,मुलींनी एकत्रित येऊन त्यांचा शतकीय वाढदिवस नातेवाईक, मित्र मंडळी आणि स्नेहींना एकत्रित आणून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.सकाळच्या सत्रात नातवंडासह त्यांनी पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान चिरंजीव श्री मार्कंडेय ऋषी यांच्या सिध्देश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिरात मार्कंडेय महाऋषी यांचं दर्शन घेतले.यावेळी पद्मशाली युवक संघटनेच्यावतीने त्याचं सत्कार करण्यात आला.सायंकाळी विडी घरकुल येथील एम आय जी सोसायटीत असलेल्या त्यांच्या निवासस्थानी शतक महोत्सव वाढदिवस साजरा करण्यात आला.हिंदू परंपरेप्रमाणे नातू नातवंडं सुना मुलांनी त्याची पाद्यपूजा करून आशिर्वाद घेतले.तद्नंतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना पीठाच्या साह्याने केलेल्या शतक दिप लावून त्यांना ओवाळणी केली.यानंतर डॉ नारायणराव दासरी यांचा केक कापून त्यांना अभिष्टचिंतन केले.यावेळी शुभेच्छा दिल्या……
वाढदिवस कार्यक्रमानंतर नातेवाईक, मित्र मंडळी यांच्यासह वैराग येथील त्यांचे स्नेही उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
Account Suspended
Account Suspended
This Account has been suspended.
Contact your hosting provider for more information.