धाराशिव, वेळापूर व किरण स्पोर्टस सोलापूरची विजयी घोडदौड…
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे मामा यांच्या जयंतीनिमित्त विभागीय निमंत्रित पुरुष खो-खो स्पर्धा

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे मामा यांच्या 122व्या जयंतीनिमित्त सुरु असलेल्या पुरुष गटाच्या विभागीय निमंत्रित खो-खो स्पर्धेत पुरुष गटात अ गटातून धाराशिवचे छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ व सोलापूरचे किरण स्पोर्टस् क्लबने प्रत्येकी दोन सामने जिंकत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या कर्मवीर मैदानावर सुरू असेलल्या या स्पर्धेत ब गटातून वेळापूरच्या अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाने दोन सामने जिंकत आघाडी घेतली आहे तर धाराशिवचे तुळजाभवानी क्रीडा मंडळ व साताराच्या स्वराज्य या संघानी प्रत्येकी एक सामने जिंकले आहेत.
मंगळवारी या स्पर्धेचा समारोप असून बार्शीच्या श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहसचिव अरुण देबडवार व बार्शीचे पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या हस्ते या स्पर्धेतील प्रथम तीन संघास बक्षिस वितरण करण्यात येईल. या संघाना अनुक्रमे 21, 15 व 11 हजार व वैयक्तिक खेळाडूंना अष्टपैलू, आक्रमक व संरक्षकाचे प्रत्येकी 2 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
रविवारी रात्री व सोमवारी सकाळी झालेल्या साखळी सामन्याचे निकाल ः अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ वेळापूर विजयी विरुद्ध श्री. तुळजाभवानी क्रीडा मंडळ, धाराशिव 18-16 (2 गुण व 30 सेकंद राखून विजयी).
किरण स्पोर्टस् सोलापूर विजयी विरुद्ध शिवप्रतिष्ठान मंगळवेढा 17-15 (2 गुणांनी विजयी)
किरण स्पोर्टस् सोलापूर विजयी विरुद्ध ओगलेवाडी स्पोर्टस् क्लब सातारा
21-15 (6 गुणानी विजयी)
छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ धाराशिव विजयी विरुद्ध शिवप्रतिष्ठान मंगळवेढा 13-12 (8.30 मि. राखून विजयी).
अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ वेळापूर विजयी विरुद्ध उत्कर्ष क्रीडा मंडळ सोलापूर 9-8 (1 डाव 1 गुणांनी विजयी).
स्वराज्य संघ सातारा विजयी विरुद्ध उत्कर्ष क्रीडा मंडळ सोलापूर 17-14 (3 गुणांनी विजयी).
तुळजाभवानी क्रीडा मंडळ धाराशिव विजयी विरुद्ध स्वराज्य क्रीडा मंडळ सातारा 16-11 (1 डाव 5 गुणांनी विजयी).