सोलापूर बातमीSolapur court matterन्यायालय निर्णयसोलापूर क्राईम

पॉक्सो कायद्याअंतर्गत २ वर्षांपासून अटकेत असलेल्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर…

एका ४ (चार) वर्षीय अल्पवयीन पिडीतेवर तिच्या राहत्या घरी लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी, यातील आरोपी राहुल चंद्रकांत कोळी, राहणार – होनसळ, तालुका – उत्तर सोलापूर, जिल्हा – सोलापूर याच्याविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक – ८८२/२०२२ नुसार भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३७६(२) (j), ३७७ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४(२), ६(१) आणि ८ अन्वये दिनांक २०/१०/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरी या प्रकरणात आरोपी राहुल कोळी यास दिनांक २०/१०/२०२२ रोजी अटक करण्यात आले होते. सदरची फिर्याद पीडितेच्या आईने दाखल केली होती आणि तसेच आरोपी राहुल कोळी याने अल्पवयीन पिडीतेला विश्वासात घेऊन तिच्यावर दुष्कर्म केले असल्याची पिडीतेने तिच्या आईकडे तोंडी तक्रार केली होती. त्यानंतर फिर्यादीने सदर घडलेला प्रकार घरातील पुरुष मंडळींना सांगितला होता. सदरच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची सखोल चौकशी करून पोलिसांनी यात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात आरोपी राहुल कोळी याने आपला जामीन अर्ज मे.जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. केंद्रे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे.या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे यांनी कामकाज पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel