सोलापूर बातमीखेळमनोरंजनमहाराष्ट्र

राहुरी कृषी, परभणी, शिवाजी, MAFSU नागपुर, BAMU व पुणे विद्यापीठांचे शानदार विजय…

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठ शिक्षक व कर्मचारी वृंद यांच्यासाठी क्रिकेट स्पर्धा सोलापुरात होत असून चौथ्या दिवशी साखळी फेरीचे 6 सामने पार पडले व त्यात सकाळच्या सत्रात राहुरीच्या महात्मा फुले कृषी, परभणी, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने आणि दुपारच्या सत्रात MAFSU नागपुर, पुणे येथील सावित्रीबाई फुले व मराठवाडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवले असून VNMKV परभणी या विद्यापीठ संघांने सलग तीन तर राहुरी कृषी, नागपूर व शिवाजी विद्यापीठाने सलग 2 विजय प्राप्त करत बाद फेरीत प्रवेश केला आहे.

चौथ्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे राहुरीच्या महात्मा फुले विद्यापीठाच्या संघाने सलामीवीर खेळाडू जालिंदरनाथ धनवटे यांच्या 20 चौकराच्या सहायाने झळकविलेले तडफदार शतकाच्या जोरावर स्पर्धेतील आत्तापर्यंतच्या सर्वाधिक 208 धावा करत सलग दुसरा सामना जिंकला. तसेच रेल्वे मैदानावर स्पर्धेतील पहिला सामना टाय होऊन सुपर ओव्हर मध्ये शिवाजी विद्यापीठाने जिंकत सलग दुसरा विजय मिळवला.

या स्पर्धेत एकूण 17 संघांनी सहभाग नोंदविला असून त्यांची विभागणी 4 गटात केली असून प्रथम साखळी पद्धतीने टी20 पद्धतीत लेदर चेंडूवर रंगीत पोशाखात अतिशय सुंदर नेटके नियोजन अंतर्गत सामने पार पडत आहेत. चारही मैदानावर सोलापूरच्या विद्यापीठाचे कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक हे समन्वयाची भूमिका पार पाडत असून जिल्हा क्रिकेट पंच संघटनेचे सर्वोतोपरी सहकार्य मिळत आहे.

पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर व प्र.कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व प्र.कुलसचिव तथा क्रीडा संचालक डॉ.अतुल लकडे यांच्या मुख्य नियोजनात सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल रेल्वे मैदान, भंडारी स्पोर्ट्स क्लब व दयानंद कॉलेज या ठिकाणी रोज 2 सामने होत असून चौथ्या दिवशी इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सामनावीराचा पुरस्कार शतकवीर जालिंदरनाथ धनवटे, मोइझ शेख याला, रेल्वे मैदानावर शिवाजी विद्यापीठाच्या विनायक शिंदे याला पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाचे डॉ.राजेंद्र वडजे (विद्यार्थी विकास मंडळ संचालक)यांचे हस्ते व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.ढेरे यांच्या हस्ते प्रकाश घुले (MAFSU नागपुर) यांना तर दयानंद कॉलेज मैदानावर मनीष गायकवाड व मुजीब शेख यांना सामनावीराचे पुरस्कार देण्यात आले.

संक्षिप्त धावफलक :
1) इंदिरा गांधी पार्क स्टेडियम
MPKV राहुरी : 208/9 (20)
जालिंदरनाथ धनवटे 111, अतुल कोराडे 29, अवांतर 22 धावा
सतीश भरडे 31/4, किरण नांदणे, सतीश लोखंडे, प्रणव कोलते, पंकज ठाकूर प्रत्येकी 1 बळी.
विजयी विरुद्ध
SGBAU अमरावती : 125/6 (20)
वारखडे 41, अनिल मेश्राम 20, अवांतर 18 धावा, संदीप त्रिपाठी 16
सचिन भिंगार्डे 17/2, अनिल थोरात, सतपाल, ज्ञानेश्वर लडकत, सचिन सोनावणे प्रत्येकी 1 बळी

मराठवाडा विद्यापीठ : 143/6 (20)
मोइझ शेख नाबाद 59, बलभीम मार्कड 27, खताळ 18, अवांतर 11 धावा
महेंद्र भाऊ 42/3, निनाद राऊत व रमेश शेवारे प्रत्येकी 1 बळी
विजयी विरुद्ध
RTM नागपूर : सर्वबाद 67 (15.5)
रितेश पुरकाम 16, निनाद राऊत 15 धावा
रणजीत तांगडे 13/3, रवी पारधी 11/3, कार्तिक चव्हाण 10/2, नितीन गायकवाड व रोहित प्रत्येकी 1 बळी.

2) रेल्वे मैदान
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर : 149/1 (20) व 12/0 (0.4)
विनायक शिंदे नाबाद 56, रमेश धोनुक्षे 49, विशाल हिलगे 36*
अभिषेक देशमुख 1 बळी.
विजयी विरुद्ध
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक : 149/6 (20) व 8/0 (1)
देविदास जाधव 42, निखिल शिंदे 37, योगेश जाधव 19, अभिषेक देशमुख 15, संदीप भागवत 13
योगेश दळवी 31/2, अनिल पाटील विनायक शिंदे राजे मुपडे प्रत्येकी 1 बळी

MAFSU नागपुर :
प्रकाश घुले 62, अजय गावंडे 27, संदीप रिंधे व अतुल ढोक 19, अवांतर 17 धावा
अरुण सपकाळे 36/2, रश्मिकांत जाधव, किशोर पवार, सुभाष पवार प्रत्येकी 1 बळी
विजयी विरुद्ध
KBCNMU जळगाव : सर्वबाद 122 (14.3)
जितेंद्र पाटील नाबाद 41, अरविंद गिरनारे 21, यश पवार 16, स्नेहल कुवर 11
संदीप गोरे 24/3, नितीन डोंगरे 15/2, अजित माळी व विठ्ठल धायगुडे प्रत्येकी 1 बळी

3) दयानंद कॉलेज मैदान
मुंबई विद्यापीठ : 140/9 (20)
सुशांत घाडी 26, मनोहर माने व सिद्धेश चव्हाण 18, सुनील मिसाळ 16, संजय भालेराव 17, प्रवीण मुळम 15, अवांतर 13
माणिक ढगे मुजीब शेख मारोती शेल्लाळे मनोज कऱ्हाळे प्रत्येकी 2 बळी
विजयी विरुद्ध
VNMKV परभणी : 141/7 (19.1)
प्रवीण पंडित 40, धीरज पाथरीकर 34, अमोल गरुड 17, अवांतर 16 धावा
सिद्धेश चव्हाण 18/3, संजय पवार 26/2, श्रीकांत मोंढे 1 बळी.

सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे : 165/3 (20)
मनीष गायकवाड 57, नितीन प्रसाद 48, बसवंत गजलवार नाबाद 25, शंतनु काशिद नाबाद 16, अवांतर धावा 15
जयराम हंबर्डे 20/1 बळी.
विजयी विरुद्ध
SRTMU विद्यापीठ नांदेड : सर्वबाद 143 (19.5)
रशीद शेख 47, पी.मुपडे 18, नरशी कागदा 17, मनोज टाक 15, अवांतर 16 धावा
बसवंत गजलवार 31/3, मनीष गायकवाड, संतोष सुगावे, शंतनु काशिद प्रत्येकी 2 व सचिन सुर्वे 1 बळी.

या सर्व सामन्यासाठी महेश सोनवणे, इरशाद बिराजदार, अशोक डोंबाळे, सुहेल शेख, चिराग शहा, चंदू मंजेली यांनी पंच म्हणून तर गुणलेखक म्हणून मिलिंद गोरे, मोहसीन मुल्ला, मजहर मंगोली यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login