सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

हराळवाडीत बैलगाडा शर्यतींचा थरार; पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गर्दी…

हराळवाडी येथे ग्रामदैवत गुरु रेवनसिद्ध महाराज यात्रेनिमित्त पारंपरिक बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला. मोहोळ तालुक्यातील या शर्यती पाहण्यासाठी पंचक्रोशीसह जिल्हाभरातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थितांनी “गुरु रेवणसिद्ध महाराज की जय” असा जयघोष करत स्पर्धकांना उत्स्फूर्त दाद दिली.

पंच कमिटीच्या वतीने आयोजित या शर्यतींसाठी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे तसेच कर्नाटक येथून हौशी बैलगाड्या मोठ्या संख्येने दाखल झाल्या होत्या. जनरल ‘ब’, चौसा, नवतर, निस नवतर आणि गावठी अशा पाच गटांत स्पर्धा घेण्यात आल्या. जनरल ‘ब’ गटात केशव शेळके (हराळवाडी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर विजय गावडे (घेरडी) यांनी द्वितीय आणि निशांत पाटील (हराळवाडी) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

चौसा गटात प्रशांत गायकवाड प्रथम, बापू गरंडे (नंदेश्वर) द्वितीय आणि आप्पा झिंजे (पडळकरवाडी) तृतीय ठरले. नवतर गटात सिद्धू बंडगर (गोणेवाडी) प्रथम, वसंत गरंडे (नंदेश्वर) द्वितीय आणि सुरेश यमगर (घेरडी) तृतीय ठरले. निस नवतर गटात बाबा चव्हाण प्रथम, पिंटू हराळे द्वितीय आणि रोहित शेळके तृतीय आले. गावठी गटात रामचंद शेळके यांनी प्रथम, केशव शेळके द्वितीय आणि बिराप्पा हराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत सुमारे ४० बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी चंद्रकांत ढगे, साधू पाटील, श्रीकांत धोडमिसे, पैलवान रवी शेळके, राजाबापू धोडमिसे, सजित पाटील, बिराप्पा हराळे, विलास शेळके, सुभाष पवार, सचिन हेगडे, रमेश शेळके, मिनू पाटील, अर्जुन ऐवळे, रामचंद शेळके, रतिकांत शेळके, विष्णू हेगडे, मोतीराम धोडमिसे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel