सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

नालंदा तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी आम्रपाली गाडे सचिव पदी मंजुश्री खंडागळे…

विजापूर रोडवरील सुप्रसिद्ध अशा नालंदा बुद्ध विहार समिती संचलित नालंदा तरुण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी बुद्धविहार समितीचे अध्यक्ष शरद वाघमारे हे होते. या सभेत नालंदा तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. आम्रपाली गाडे तर सचिव पदी सौ .मंजुश्री खंडागळे यांची निवड एकमताने करण्यात आली. उपाध्यक्षपदी सौ बबीता बाबरे यांची निवड करण्यात आली, सहसचिव म्हणून सौ जयश्री नडगिरी यांची निवड करण्यात आली. हिशोब तपासणीस म्हणून सौ माया लोंढे यांची निवड करण्यात आली. कार्यकारणी सदस्य म्हणून सुजाता गायकवाड, स्वाती शिंदे, राजश्री वाघमारे, मंगल शिंदे, मंगल कांबळे, शिला हावळे यांची निवड करण्यात आली . खजिनदार म्हणून विजयकुमार क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. सल्लागारपदी मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या सौ.सुशिलादेवी भालशंकर, सौ.रुक्मिणी खंडागळे, महादेवी चंद्रशा गायकवाड यांची निवड करण्यात आली .या सभेचे प्रास्ताविक बुद्ध विहार समितीचे विश्वस्त समाजभूषण अण्णासाहेब भाळशंकर यांनी केले, सूत्रसंचालन चंद्रमणी वाघमारे यांनी केले तर नूतन सरचिटणीस मंजुश्री खंदागळे यांनी सर्वांचे आभार मानले .

या वार्षिक सर्वसाधारण सभेला मंडळाचे सुशीलचंद्र भालशंकर, अशोक प्रधान , शशिकांत बाबरे, परदेशी कका,प्रा. मादळे सर, कपिल क्षीरसागर, अश्र्वाजित दुपारगुडे, सुमित चलवादी, सिद्धार्थ बनसोडे, मिलिंद भालशंकर , रणजित काटे, अतुल वाघमारे ,ज्योती खंडागळे , बेरे काका ,इत्यादी शेकडो सभासद उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel