सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसोलापूर महानगरपालिकासोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

“नूतन नगरसेवकांचा शाळेत सत्कार; शिक्षण व विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची ग्वाही”

अक्कलकोट रोड वरील, सद्संकल्प शिक्षण समूहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालय येथे सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ११ मधील नूतन नगरसेवकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात नगरसेवक युवराजदादा सरवदे, मीनाक्षी कडगंची व अजय पोन्नम माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्संकल्प शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्थेचे कोषाध्यक्ष प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड,मुख्याध्यापिका मंजुष्री खंडागळे , आप्पू कडगंची,मुख्याध्यापक विनोद वर,मुख्याध्यापक अविनाश भालशंकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.

राजकुमार हंचाटे यांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांना आवश्यक त्या सुविधा द्याव्या असे आवाहन त्यांनी नगरसेवकांना केले.

अजय पोन्नम यांनी परिसरातील पायाभूत सुविधा आणि शाळांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच पर्यावरणाचे व प्रदूषणाचे परिणाम त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

अध्यक्षीय स्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर यांनी
शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे मूळ आहे. शाळा, पालक व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवता येते, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. तसेच शिक्षण क्षेत्रात अधिक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक सत्यवान पाचकूडवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन साहेबलाल लालखां यांनी केले.

हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थित पालकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel