सोलापूर बातमीदेश - विदेशमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक
सोलापूरच्या डॉ.ज्योती वाघमारे यांची राष्ट्रीय समितीवर नियुक्ती…

भारत सरकारने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती देशपातळीवर साजरी करण्यासाठी देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय राष्ट्रीय समितीची स्थापना केली आहे.
अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे, या प्रतिष्ठित समितीवर सोलापूरच्या सुकन्या आणि लोकप्रिय राज्यसभा खासदार डॉ. ज्योती ताई वाघमारे यांची ‘सदस्य’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने अधिकृत राजपत्राद्वारे ही घोषणा केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या समितीत देशभरातील मोजक्या १२५ मान्यवरांचा समावेश आहे.
या नियुक्तीमुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सामाजिक न्याय आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्यात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची ही राष्ट्रीय दखल आहे.



