solapurpoliceमहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

वळसंग पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेची हरवलेली पर्स सुखरूप परत; रोख रक्कम व सोन्याचे दागिने सुरक्षित

आज रोजी दुपारी सुमारे 16.00 वा. महिला प्रवासी नामे फातिमा गुडू शेख, वय 65 वर्षे, रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर या वळसंग पोलीस ठाणे येथे येऊन तोंडी माहिती दिली की, त्या सोलापूर येथून वळसंगकडे स्वारगेट–गुलबर्गा बसने प्रवास करीत असताना वळसंग बसस्टॉप येथे उतरल्यावर त्यांची पर्स गहाळ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

सदर बाबत तात्काळ पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास मालचे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल यादव व महिला पोलीस हवालदार अनिशा पटेल यांना माहिती देऊन आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास मालचे यांनी तात्काळ एस.टी. कंट्रोलर श्री अंबाना कोळी, अक्कलकोट बस आगार यांच्याशी संपर्क साधून संबंधित बस अक्कलकोट डेपो येथे पोहोचल्याची खात्री करून सदर बसमध्ये प्रवासी महिलेची पर्स शोधण्याबाबत सूचना दिल्या.

त्यानुसार अंबाना कोळी यांनी संबंधित बस थांबवून अक्कलकोट येथे चौकशी केली असता महिला प्रवासी यांची गहाळ झालेली पर्स मिळून आली. सदर पर्समध्ये मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच अंदाजे 8 ग्रॅम सोन्याचे बोरमाळ व इतर सर्व वस्तू सुरक्षित मिळून आल्या. त्यानंतर सदर सर्व मुद्देमाल पोलीस ठाणे येथे आणून संबंधित महिला प्रवासी यांना सुखरूप परत देण्यात आला.

सदर कार्यवाही पोलीस कर्मचारी व एस.टी. कंट्रोलर यांच्या तत्परता व सतर्कतेमुळे यशस्वीरीत्या पार पडली असून महिला प्रवासी यांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel