सोलापूर क्राईममहाराष्ट्रसोलापूर बातमी

भंगार चोरी प्रकरण : अतिक्रमण प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज फैसला

सोलापूर महापालिकेच्या भंगार चोरी प्रकरणात अतिक्रमण प्रमुख जगन्नाथ बनसोडे व इतरांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी जगन्नाथ बनसोडे यांनी ॲड. निलेश जोशी यांच्यामार्फत सोलापूर जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

सुनावणीदरम्यान बनसोडे यांना खोटेपणाने गुंतवण्यात आल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ‘अर्नेश कुमार’ प्रकरणातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवादही करण्यात आला. चोरी झालेल्या वस्तूंची शहानिशा व कागदपत्रांची पडताळणी न करता घाईघाईत दबावाखाली गुन्हा दाखल केल्याचा आरोपही करण्यात आला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावरील आदेशासाठी आज (गुरुवार) तारीख ठेवली असून, आता न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login