खेळमहाराष्ट्रसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

खो-खो स्पर्धेत धाराशिव-ठाणे अंतिम फेरीत…

राज्य निमंत्रित महिला स्पर्धा : कबड्डीमध्ये मुंबई उपनगर, गंगाखेड, बारामती, सांगली उपांत्य फेरीत...

राज्य निमंत्रित महिलांच्या खो खो स्पर्धेत ठाण्याचे ज्ञानविकास स्पोर्ट्स फाउंडेशन व धाराशिवचे छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाने अंतिम फेरीत प्रवेश केला. कबड्डीमध्ये स्वराज्य स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर, आनंदवन महिला संघ गंगाखेड (परभणी), बारामती स्पोर्ट्स क्लब व प्रोग्रेस अकॅडमी सांगली या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर हिंदू धर्मरक्षिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीने ही स्पर्धा सोलापूर जिल्हा कबड्डी व खो-खो असोसिएशन आणि उत्कर्ष क्रीडा मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित केली आहे.

खो-खो स्पर्धेतील उपांत्य सामन्यात दिव्या गायकवाड (४.००, २. ४० मि. व ३ गुण), धनश्री कंक ( १.५० मि. व ४ गुण) यांच्या अष्टपैलू खेळीमुळे ज्ञानविकास स्पोर्ट्स फाउंडेशनने ठाण्याच्याच शिवभक्त क्रीडा मंडळाचा १५-१३ असा पराभव केला. मध्यंतराची ७-४ ही आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. शिवभक्तकडून रेश्मा राठोड (२.००, २. १० मि. व २ गुण ) हिची लढत अपुरी ठरली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात धाराशिवने रत्नागिरीच्या आर्यन स्पोर्ट्स क्लबवर ११-६ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळवला. अश्विनी शिंदे (३.५० मि. व ३ गुण ) व सुहानी धोत्री (४ गुण व १. २० नाबाद ) यांची अष्टपैलू खेळी संघास सहज विजय मिळवून दिली. रत्नागिरीकडून पायल पवार (१. ०० मि. व २ गुण) हिचे एकाकी प्रयत्न अपुरे पडले

कबड्डीच्या साखळी सामन्यात
​​बारामतीने वैष्णवी क्लब परभणी ५३-२२ अशी सहज मात केली यात ​ निकिता लंगोटे व वैष्णवी चव्हाण यांच्या चढाई उत्कृष्ट झाल्या.
​दुसऱ्या सामन्यात आनंदवन महिला संघ परभणीने ​विश्वशांती क्रीडा मंडळ ३७-१२ असा विजय मिळविला. यात ​​कीर्ती ढीगोळे, लावण्य वाडेकर, आसफिया शेख व यशस्वी इंगोले यांच्या चढाया व शितल मगळे, कावेरी आडे यांच्या पकडी प्रेक्षणीय ठरल्या.
अन्य एका सामन्यात निकिता कवडे व कोमल महाजन यांच्या चढायामुळे बारामती अकॅडमीने नाशिक महिला संघास ५३-२८ असे नमविले.
​स्वराज्य स्पोर्ट्स क्लबने सोलापूर महिला संघास ५१-२५ असे हरविले. यात याशिका पुजारी, प्रज्ञा माने, संस्कृती माने यांच्या चढाया आणि सायली सपकाळ, सई ताम्हणकर व श्रद्धा अचलेरी यांच्या पकडी उल्लेखनीय ठरल्या. दुसऱ्या सामन्यात साकिब रंगरेज (चढाई) व अक्षदा पादव (पकड) यांच्या खेळीमुळे स्वराज्य स्पोर्ट्स क्लबने प्रोग्रेसिव्ह स्पोर्ट्स क्लब ४०-२१ ​नमविले.

अन्य निकाल :क्रांतीजोत क्रीडा मंडळ विजयी विरुध्द सोलापूर महिला संघ ६१-२३.
​​आनंदवन महिला संघ परभणी विजयी विरुध्द नाशिक महिला संघ ४५-३६.

असे होणार उपांत्य सामने
स्वराज्य स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर विरुद्ध आनंदवन महिला संघ गंगाखेड परभणी. बारामती स्पोर्ट्स अकॅडमी बारामती विरुद्ध प्रोग्रेस अकॅडमी सांगली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel