सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईम

नई जिंदगीतील मदिना चौकात रिक्षा चालकावर चाकू हल्ला! पोलिसात गुन्हा दाखल!

सोलापूर (प्रतिनिधी) – रिक्षा भाड्यासाठी थांबलेल्या चालकाला जुन्या पैशाच्या कारणावरून ४ जणांनी घेरून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत चाकू सारख्या हत्याराने डोक्यावर वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना मदिना चौकात घडली आहे.

पोलीस ठाणे – विजापूर नाका पोलीस ठाणे
गु.र.नं व कलम – ५६७/२०२६ भा न्याय सं कलम ११८(१),११५(२),३५२,३५१(२),(३)(५) प्रमाणे
गु.घ.ता.वेळ/ठि. – दि. ०९/१०/२०२६ रोजी १५.०० वा चे सुमारास, मदिना चौक, सोलापूर
गु.दा.ता.वेळ – दि १०/१०/२०२६ रोजी ०२.१९ वा.
फिर्यादीचे नाव – अशपाक कासिम जिराती, रा. देसाई नगर, नई जिंदगी, सोलापूर
आरोपीचे नाव – १) यासीन शेख, २) त्याचा भाऊ, ३) आदम शेख, ४) अज्ञात इसम, सर्व रा. नई जिंदगी, सोलापूर

हकीकत अशी की,
यात हकिकत अशी की, वरील वेळी व ठिकाणी, यातील फिर्यादी नमुद ठिकाणी रिक्षा भाडेसाठी थांबले असताना मागील घेतलेले पैसेच्या कारणावरून यातील आरोपीत क्रं. १ ते ४ यांनी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत आरोपीत क्रं. १ याने चाकू सारखे दिसणारे वस्तुने फिर्यादीचे डोक्यावर मारून जखमी करून शिवीगाळव धमकी दिली आहे म्हणून.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेको/ १२०४ मणुरे- ८६६८७२६०३१ हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel