सोलापूर बातमीमहाराष्ट्र

कामगार चळवळीतील योगदानाबद्दल आडम मास्तर यांचा सन्मान !

कामगारांच्या हितासाठी नेहमीच कामगारांसोबत उभा राहीन; सहाय्यक कामगार आयुक्त श्री. झोले यांचा निर्धार

सोलापूर जिल्ह्यात सर्वच क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी आहे. राज्य व केंद्र शासनाच्या कामगारांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी नेहमीच आपण कामगारांसोबत नक्कीच उभा राहीन असा निश्चय सहाय्यक कामगार आयुक्त श्री. मंगेश झोले यांनी उपस्थित कामगारांसमोर व्यक्त केला. आडम मास्तर यांनी आशिया खंडातील सर्वात मोठा घरकुल प्रकल्प उभारुन ३० हजार कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून दिल्याबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंद मजदूर पंचायतचे प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अॅड.रा.गो. म्हेत्रस, मौलाना आझाद महामंडळाचे माजी जिल्हा व्यवस्थापक सी.ए. बिराजदार, सरकारी कामगार अधिकारी जयदीप मगर, नदाफ पतसंस्थेचे चेअरमन सलीम नदाफ, अर्जुन सलगर, पत्रकार सल्लाऊद्दीन शेख, माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी, माकपचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड युसूफ मेजर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळेस बोलताना सहाय्यक कामगार आयुक्त श्री. झोले यांनी आपण शासनाच्या कामगारांसाठी असलेल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे आवर्जून सांगितले व सर्वच कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करु असे आश्वासित केले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना आडम मास्तर यांनी सांगितले की मागील ३० वर्षापासून असंघटीत व विडी कामगारांसाठी आंदोलन करुन त्यांना न्याय देण्यसाठी आजही झगडत आहे. विडी कामगारांना राज्य शासनाने किमान वेतन म्हणून प्रतिदिन ३७९ रुपये जाहिर करुन तसा शासन निर्णय काढला आहे. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी याकरिताही आम्हाला पुन्हा आंदोलन करण्याची गरज आहे. माझा हा सन्मान म्हणजे शहरातील व राज्यातील सर्व क्षेत्रातील कामगारांचा मी गौरव समजतो. या सत्कारामुळे माझी जबाबदारी पुन्हा वाढली आहे. नव्या जोमाने पुढील काळात कार्य करण्याची उमेद निर्माण झाली असल्याचे आडम मास्तर यांनी याप्रसंगी सांगितले.

प्रारंभी प्रस्ताविक व स्वागत साथी बशीर अहमद यांनी केली. योवळी सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार हिंद मजदूर पंचायतच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्साठी सिध्दार्थ बोराडे, कॉ. एजाज शेख, चंद्रशेखर बदलापूरे, श्रीमती फरीदा गोट्यालकर, छगन पंढरे, दौला शेख, कॉ.शरणू गुडीयवरु, कॉ. निहाल शेख, श्रीमती लक्ष्मी देवकर, श्रीमती यास्मीन अन्सारी, इम्रान मंगलगिरी, कॉ. जहीर शेख, मुशताक शेख, बाबा बागवान, अशपाक शेख आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिध्दार्थ बोराडे तर आभार प्रदर्शन कॉ शंकर तुम्मा यांनी मानले. यावेळी महिला-पुरुष कामगार मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel