सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईम

शिवसेना शिंदे गटाच्या युवा नेत्यावर प्राणघातक हल्ला! शेतीच्या वादातून चुलत भावाने चाकू आणि दगडाने हल्ला केल्याचा आरोप..

दक्षिण सोलापूरात राजकीय क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते आणि विधानसभेचे उमेदवार सचिन प्रकाश सोनटक्के, वय ४५ वर्षे, यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन सोनटक्के यांच्यावर त्यांचे चुलत भाऊ ओंकार रमेश सोनटक्के यांनी चाकू आणि दगडाने हल्ला केल्याचा आरोप आहे. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जळकोट येथे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यात सचिन सोनटक्के यांच्या डोक्याला आणि पाठीच्या भागाला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हा हल्ला शेतीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण तपशील अधिकृत तपासातून स्पष्ट होणे aअपेक्षित आहे.शिवसेना शिंदे गटाच्या युवा नेत्यावर झालेल्या या कथित प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आता या प्रकरणात पोलीस तपासात काय समोर येते, हल्ल्यामागचे नेमके कारण काय आणि संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel