सोलापूर बातमीक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईम

सोलापूर हादरले! सख्ख्या चुलत सासऱ्याकडून सुनेला बेदम मारहाण, ढकलून दिल्याने हाताचे मनगट फ्रॅक्चर; सरकारी नोकरी घालवण्याची धमकी!

सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापुरातील गवळी वस्तीत नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. मोकळ्या जागेत बांधकाम करू नका असे सांगितल्याच्या रागातून चुलत सासरे आणि दीरांनी सुनेला शिवीगाळ करीत बेदम मारहाण करून तिचा हात फ्रॅक्चर केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

पोलीस ठाणे – फौजदार चावडी पोलीस ठाणे
गु.र.नं – ७६१/२०२६ कलम १२५(ब), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) BNS प्रमाणे
घटना – दि. ०८/१०/२०२६ रोजी सकाळी १०.३० वा. गवळी वस्ती, लक्ष्मी पेठ, सोलापूर
गुन्हा दाखल – दि. ११/१०/२०२६ रोजी १७.३६ वा.

फिर्यादी – पुजा अर्जुन यमगर, रा-४३१ गवळी वस्ती, लक्ष्मी पेठ, सोलापूर
नराधम आरोपी – १) रमेश कृष्णा यमगर २) धर्मराज रमेश यमगर ३) प्रकाश रमेश यमगर ४) अनुसया यमगर सर्व रा. गवळी वस्ती, सोलापूर

हकीकत काय?
फिर्यादी पुजा यमगर यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत सिमेंट रोडवर त्यांच्या चुलत सासऱ्यांपैकी असलेल्या आरोपींनी बांधकाम सुरू केले होते. “मोकळ्या जागेत येऊन बांधकाम करू नका” असे फिर्यादीने सांगितल्याने आरोपींच्या मनात राग धरला.

रागाच्या भरात आरोपी क्र. ४ अनुसया यमगर हिने अर्वाच्य शिवीगाळ केली. आरोपी क्र. २ धर्मराज यमगर याने “तुझा नवरा सरकारी नोकर आहे, त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याची नोकरी घालवितो” अशी मुजोरीची धमकी दिली.

इतक्यावरच न थांबता सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीस हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरोपी क्र. ३ प्रकाश यमगर याने पुजाचे हात धरून जोरात ढकलून दिले. त्या धक्क्याने त्या खाली सिमेंट रोडवर आदळल्या आणि त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर जबर मार लागून फ्रॅक्चर झाले असून त्या जबर जखमी झाल्या आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेको/ १३३४/ भद्रशेट्टी – ८८८८९१७७७० हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel