solapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूर हादरले! माहेरून १० लाख आणण्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ, चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ; पतीसह सासरच्या ६ जणांवर गुन्हा..!

सोलापूर (प्रतिनिधी) – लग्नात मानपान केला नाही, संसार उपयोगी सामान दिले नाही म्हणत आणि माहेरहून घर बांधकामासाठी १० लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे.

पोलीस ठाणे – एमआयडीसी पोलीस ठाणे
गु.र.नं – ८८४/२०२६ कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) BNS प्रमाणे
घटनेचा कालावधी – दि. २५/०७/२०२४ ते दि. ०४/०६/२०२६ दरम्यान, फिर्यादीचे सासरी, सोलापूर
गुन्हा दाखल – दि. ११/१०/२०२६ रोजी २०.०० वा.

फिर्यादी – उर्मिला भिमाशंकर गायकवाड, रा-४०७ श्रध्दा एम्रल्ड, अ.कोट रोड, सोलापूर
आरोपी – १) भिमाशंकर – पती २) नागनाथ – सासरे ३) महेश – दीर ४) आम्रपाली – नणंद ५) दिपाली – नणंद ६) सुशीला – पतीची आत्या, सर्व रा-१० मरगु टॉवर, अ.कोट रोड, सोलापूर

हकीकत काय?
यातील आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस लग्नात मानपान केला नाही, संसार उपयोगी सामान दिले नाही या कारणावरून तिच्या चारित्र्यावर घाणेरडा संशय घेतला. तिला घालून पाडून बोलून अपमानीत करून अर्वाच्य शिवीगाळ केली.

इतकेच नाही तर माहेरून घर बांधकामासाठी १० लाख रुपये घेऊन ये म्हणून तगादा लावत शिवीगाळ करून शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देऊन तिचा अमानुष छळ केला आहे.

अखेर त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत न्यायाची हाक दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेको/ १९१/ मुजावर – हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel