सोलापूर हादरले! 19 वर्षीय गायत्री अचानक बेपत्ता ; पोलिसांकडून शोध सुरू!

सोलापूर शहरातून एक १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. गायत्री विजयमान देवडे, वय १८ वर्षे ९ महिने, असे या तरुणीचे नाव असून, याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री देवडे ही ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कल्याण नगर, भाग क्रमांक ३, सोलापूर येथून बेपत्ता झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची नोंद ९ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९ वाजून २० मिनिटांनी करण्यात आली.
दरम्यान, गायत्री नेमकी कुठे गेली, ती बेपत्ता होण्यामागचे कारण काय, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन!
बेपत्ता तरुणी कुठेही आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने विजापूर नाका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
आता गायत्रीचा शोध कधी लागणार आणि या प्रकरणात पुढे काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



