सोलापूर जिल्ह्यात MAHATET 2026 साठी 47 परीक्षा केंद्रे सज्ज; 28,298 परीक्षार्थी सहभागी होणार…
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करावे-निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 ही रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी राज्यभर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 47 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून 28 हजार 298 परीक्षार्थी सहभागी होणार आहेत. तरी ही परीक्षा यशस्वीपणे घेण्यासाठी योग्य नियोजन करावे व आवश्यक मनुष्यबळ सर्व शासकीय विभागातून उपलब्ध करून घ्यावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महाराष्ट्र पात्रता परीक्षा 2026 च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत श्री. पाटील बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत, कोषागार अधिकारी रणजीत कदम यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. पाटील म्हणाले की, या परीक्षेसाठी किमान चार ते पाच भरारी पथकाची नियुक्ती करा. 47 परीक्षा केंद्रावर पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवावा. परीक्षा पेपर कोषागार कार्यालयात व्यवस्थित ठेवून प्रत्येक परीक्षा केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी पोलीस विभागाने आवश्यक बंदोबस्त द्यावा. या परीक्षेसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ यांची नियुक्ती आदेश काढावे तसेच अतिरिक्त दहा ते पंधरा टक्के मनुष्यबळ रिझर्व ठेवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
प्रारंभी शिक्षणाधिकारी श्री. शेख यांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ही रविवार 28 जून रोजी सोलापूर शहरातील 47 केंद्रावर परीक्षा होणार असून पेपर क्रमांक 1 सकाळी 10:30 ते 1:00 या वेळेत होईल. या पेपरसाठी 12 हजार 261 परीक्षार्थी बसणार आहेत.पेपर क्रमांक 2 दुपारी 2:30 ते 5:00 या वेळेत होईल. या पेपरसाठी 16 हजार 37 परीक्षार्थी बसणार आहेत.परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची नावे व पत्ते खालीलप्रमाणे दिली आहेत:-
संगमेश्वर पब्लिक स्कूल, सात रस्ता संगमेश्वर कॉलेज सोलापूर; हरिबाई देवकरण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, होम मैदानासमोर सोलापूर; एस.व्ही.सी.एस. हायस्कूल, एमआयडीसी अक्कलकोट रोड सोलापूर; एस.व्ही.सी.एस. हायस्कूल, 84 भवानी पेठ सोलापूर; नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल, निलम नगर एमआयडीसी सोलापूर; सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव, पी.ए.एच. सोलापूर विद्यापीठासमोर, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर; जे.आर. चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, बाळे, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर; एस.एस.ए. उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, 370-ए मुस्लिम पाच्छा पेठ सोलापूर; स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल, पोलीस मुख्यालय अशोक चौक सोलापूर; श्री दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल, 13 बीसीडीई एसबीआयसमोर बुधवार पेठ बाळीवेस सोलापूर; सिद्धेश्वर बॉईज हायस्कूल, 1 सिद्धेश्वर पेठ जिल्हा परिषदाजवळ सोलापूर; संगमेश्वर कॉलेज, 165 रेल्वे लाईन्स सोलापूर; अनप्पा कदाड हायस्कूल, 26सी भवानी पेठ तुळजापूरवेस सोलापूर; वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय, वालचंद हिराचंद मार्ग अशोक चौक सोलापूर; कुचन हायस्कूल, 272 रविवारी पेठ सोलापूर; श्री सिद्धेश्वर बाल मंदिर इंग्रजी माध्यम शाळा, 910 भवानी पेठ सोलापूर; सोलापूर सोशल असोसिएशन कला व वाणिज्य महाविद्यालय, 121 सिद्धेश्वर पेठ सोलापूर; बेगम कमरुन्निस्सा करिगीर मुलींचे हायस्कूल, 141/ए सिद्धेश्वर पेठ सोलापूर; सेंट जोसेफ हायस्कूल, 45 रेल्वे लाईन्स सोलापूर; पोदार इंटरनॅशनल स्कूल सोलापूर, सर्वे नं. 19/06 राजस्व नगराजवळ विजापूर रोड सोलापूर; श्री नवलबाई फुलचंद शहा कोठारी हायस्कूल, शिवगंगा नगर-5 कुमठा नाका सोलापूर; व्हॅलेंटाईन सर्कल इंग्रजी माध्यम, प्लॉट नं. 2 वज्रेश्वरी नगर अक्कलकोट रोड यल्लालिंग मठाजवळ सोलापूर; जागृती विद्या मंदिर, नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर; भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय, जुळे सोलापूर विजापूर रोड; प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उर्दू हायस्कूल, 229-एल दक्षिण सदर बाजार सोलापूर; सुरजबाई रामलाल मुलींचे हायस्कूल सेवासदन, 101 मुरारजी पेठ सरस्वती चौक सोलापूर.
मॉडर्न हायस्कूल, कॅम्प सोलापूर (गांधीनगर जवळ);
म. आ. पांगल अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, 141 अ, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर;
संभाजीराव शिंदे प्रशाला, मुरारजी पेठ, सोलापूर;
सिद्धेश्वर गर्ल्स हायस्कूल, सिद्धेश्वर पेठ, जिल्हा परिषद, सोलापूर;
छत्रपती शिवाजी प्रशाला, 101 ब, मुरारजी पेठ, सोलापूर;
उमाबाई श्राविका विद्यालय, 107, न्यू बुधवार पेठ, सोलापूर;
लेट विलासचंद्र मोतीचंद मेहता हायस्कूल, स. नं. 316 विशाल नगर, जुले सोलापूर;
चंद्रभागाबाई यलगुरवार प्रशाला, रत्नदीप हाऊसिंग सोसायटी जवळ, सिव्हिल लाईन्स, विकास नगर, होटगी रोड, सोलापूर;
शरदचंद्र पवार प्रशाला, अवंती नगर, मुरारजी पेठ, डोल पुणे रोड, सोलापूर;
रावजी सखाराम हायस्कूल, कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग, 24/अ/14 बुधवार पेठ, स्मार्ट चौक, सोलापूर 413002;
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ;
एस. आर. चंदक इंग्लिश हायस्कूल, 194/1, बुधवार पेठ, चंदकप्रांगण, सोलापूर;
श्री दत्त प्रशाला, श्रीशैल नगर, एमआयडीसी, अक्कलकोट रोड, आकाशवाणी केंद्राजवळ, सोलापूर 413006;
सोनामाता आदर्श कन्या विद्यालय, 158, रेल्वे लाईन, मोदी, सोलापूर;
सखुबाई हिराचंद नेमचंद प्रशाला, 175, गोल्ड फिंच पेठ, गणपती घाट, दत्त चौक, सोलापूर;
श्री वसंतराव नाईक हायस्कूल, 928, नॉर्थ सदरबाजार, सोलापूर;
बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल, स. नं. 63/1अ एफ.पी. नं. 34, उजनी कॉलनी, कुंठा नाका, सोलापूर 413003;
युनिक इंग्लिश मीडियम स्कूल, कॉलेज ऑफ फार्मसी कॅम्पस, जुळे सोलापूर;
सौ. बी. एम. पुली कन्या प्रशाला, 213 साखर पेठ, सोलापूर;
बी. एफ. दमानी प्रशाला, 194/1 बुधवार पेठ, सोलापूर;
एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल, दूध पंढरीसमोर, होंडा शोरूम मागे, केगाव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर.



