solapurpoliceसोलापूर अपघातसोलापूर बातमी

सोलापूर : मित्राच्या भरधाव दुचाकीवरून पडून तरुणाचा मृत्यू; विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जेवण करून मित्राच्या दुचाकीवरून घरी परतत असताना, भरधाव वेगाने व हयगयीने दुचाकी चालवल्याने ताबा सुटून झालेल्या अपघातात 30 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी दुचाकीचालक मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

दि. 7 जून 2026 रोजी पहाटे 2.30 वा. च्या सुमारास सैफुल, सोलापूर येथील शगुप्ता दालचावलजवळ हा अपघात झाला. मयताचे नाव विशाल जाधव (रा. 112, सनत नगर, लिमयेवाडी, सोलापूर) असे आहे.

 

फिर्यादी प्रिया विशाल जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती विशाल व त्यांचा मित्र करण शाम भणगे (आरोपी) हे जेवण करून करणच्या दुचाकी क्र. एम एच 13 डी एन 9014 वरून घरी येत होते. नमूद ठिकाणी आरोपी करण याने दुचाकी भरधाव वेगाने व हयगयीने, इतरांचे जीवितास धोका होईल अशा पद्धतीने चालवली.

 

त्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्यावर पडली. या अपघातात पाठीमागे बसलेले विशाल यांच्या डोक्यास व तोंडावर जबर मार लागला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

या प्रकरणी दि. 8 जून 2026 रोजी रात्री 10.29 वा. विजापूर नाका पोलिस ठाण्यात गु.र.नं. 318/2026 नुसार भा.न्याय संहिता कलम 106, 281, 125(अ)(ब) सह मोवाकाक 177, 184 प्रमाणे आरोपी करण शाम भणगे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

तपास पोहेकॉ/1201 जाधव (मो. 9850660299) करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)