सोलापुरात सकल मुस्लिम समाज आक्रमक…नाजिया खानवर गुन्हा दाखल करा

वादग्रस्त वक्तव्य करून इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद (स.) यांच्याविरोधात कथितरीत्या आक्षेपार्ह व अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप करत नाझिया खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सकल मुस्लिम समाज, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आली.
यासंदर्भातील निवेदन सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. निवेदनात संबंधित व्यक्तीच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला असून, कायद्यानुसार तातडीने गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते साहिल रामपुरे, प्रहार संघटनेचे जमीर शेख, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण, एमआयएमचे नगरसेवक बाबा अड्डेवाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुबेर बागवान, सोहेल कुरेशी, अब्दुल्ला डोणगावकर, कादर भागनगरी तसेच सकल मुस्लिम समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…



