सोलापूर बातमीमनोरंजनमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

‘इंटरनॅशनल भरतनाट्यम्’ स्पर्धेत सोलापूर पद्मशालीच्या ‘अनुष्का’ ठरली तृतीय विजेती’ !

सोलापूर : अखिल नटराजम् आंतर सांस्कृतिक संघ नागपूर आणि मेंबर ऑफ द इंटरनॅशनल डान्स कौन्सिल (CID) पॅरिस, फ्रान्स यांच्या मान्यतेने आयोजित ‘वर्ल्ड परर्फानिंग आर्ट्स चॉम्पियन्सशिप – सिझन 8’ या स्पर्धेत सोलापूरातील पद्मशाली समाजाच्या अनुष्का श्रीकांत आरकाल हिने ‘भरतनाट्यम्’ (सोलो ज्युनियर) प्रकारात तृतीय क्रमांक पटकावले.
‘निली मेघामलू लो’…. (निळा आकाशा मध्ये) ह्या गाण्यावर भरतनाट्यम् नृत्य करुन तृतीय क्रमांक मिळवली. या स्पर्धेत सबंध भारतासह विदेशामधल्या काही स्पर्धकांसह जवळपास ४५ ते ५० स्पर्धकांनी सहभागी झाले होते. भरतनाट्यम्, कुच्चुपडी, कथ्थक, ओडिसा, मोहिनीथ्थम, सेमी क्लासिकल, फॉक, बॉलीवूड हीपहॉप, मॉडर्न आधी नृत्य स्पर्धेत अमेरिका, पॅरिस, सिंगापूर आधी विदेशासह भारतातील विविध राज्यातून अनेक अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. हा स्पर्धा नृत्य केलेला व्हिडिओ पाठवून त्याला सोशल मिडियावर लाईक, शेअर आणि विव्ह्स यावरही गुण दिले जातात. अनुष्काला 1234 लाईक 4550 पेक्षाही अधिक जणांनी शेअर केले तर, विव्ह्स 5491 जणांनी पाहिले. नुकतेच आंध्रप्रदेश येथील नेल्लूर येथे झालेल्या ‘भरतनाट्यम् स्पर्धेत’ सबंध भारतामधून तिस-या क्रमांकाने विजेती ठरली होती. अनुष्का आरकाल ही सोलापूरातील पद्मशाली शिक्षण संस्थेच्या डी.आर. श्रीराम इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये सहावीच्या वर्गात शिकत आहे. सदरच्या स्पर्धेत तृतीय क्रमांकाने आल्याबद्दल तिचा सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel