सलाहोद्दीन शेख यांची पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती; पुणे-सोलापूर विभागाची जबाबदारी खांद्यावर तर सय्यद मुजासिम पीरजादे यांची सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष पदी निवड…

शिवसेना अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा वक्फ बोर्ड अध्यक्ष समीर काझी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; संघटन विस्ताराला मिळणार नवी दिशा
सोलापूर : शिवसेना अल्पसंख्यांक पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी सलाहोद्दीन शेख यांची पश्चिम महाराष्ट्र (पुणे-सोलापूर) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समीर काझी (राज्यमंत्री दर्जा) यांच्या शुभहस्ते सलाहोद्दीन शेख यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. त्याच बरोबर सय्यद मुजासिम पीरजादे यांची सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष. म्हणून निवडीचे पत्र देण्यात आले..
पुणे आणि सोलापूर या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील संघटन मजबूत करण्याची मोठी जबाबदारी आता सलाहोद्दीन शेख यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात संघटनेचा विस्तार तळागाळापर्यंत करण्यासाठी व्यापक नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सलाहोद्दीन शेख यांनी यापूर्वी केलेल्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विविध सामाजिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या, युवकांचे प्रश्न तसेच संघटनात्मक विषयांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समीर काझी यांनी सलाहोद्दीन शेख यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवसेना ची विचारधारा आणि उद्दिष्टे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही करण्यात आले.
पुणे-सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना अल्पसंख्यांक ची मजबूत पकड निर्माण करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात असून, आगामी काळात सलाहोद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.



