Solapur court mattersolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूरात घर फोडून ३ लाखांचे सोने लंपास..!

सोलापूरात घर फोडून ३ लाखांचे सोने लंपास

सोलापूर – सनाथ नगर येथे चोरट्याने घरासमोरच्या पायपुसणीखाली ठेवलेली चावी चोरून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे ३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत.

घटनेचा तपशील –

फिर्यादी संतोष अप्पाराव बिराजदार (वय ४६, रा. १२२/१२३, सनाथ नगर) यांनी नेहमीप्रमाणे घराची चावी पायपुसणीखाली ठेवली होती. दि. ८ सप्टेंबर सकाळी ११ ते ९ सप्टेंबर सकाळी १० या कालावधीत अज्ञात चोरट्याने ती चावी घेऊन कुलूप उघडले आणि थेट बेडरूममधील कपाटातील ड्रॉवर फोडला.

ड्रॉवरमध्ये ठेवलेले १.५ तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, अर्धा तोळ्याची अंगठी आणि अर्धा तोळ्याचे कर्णफूल असा एकूण ३,००,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६९/२०२६ – BNS कलम ३०५, ३३१(१), ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुतवळ करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel