solapurpoliceक्राईममहाराष्ट्रराजकीयसोलापूर क्राईमसोलापूर बातमीसोलापूर राजकीय

सोलापूर पोलीस आयुक्त M राजकुमार यांचा आदेश…!

सोलापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी : गौरी-गणपती स्थापनेसाठी ३ दिवस वाहतूक मार्गात बदल, या रस्त्यांवर बंदीसोलापूर, दि. ११ – सार्वजनिक गणेशोत्सव आणि गौरी गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून महत्त्वाचा जाहीरनामा काढण्यात आला आहे. गर्दीमुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील मध्यवर्ती भागातील काही मार्ग ३ दिवस सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३३ चे पोटकलम (१) व (ब) अन्वये हा आदेश जारी केला आहे.

का बंद? आणि केव्हा बंद?

ज्याअर्थी दिनांक १४/०९/२०२६ रोजी सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना आणि दि. १६/०९/२०२६ रोजी गौरी गणपती आवाहन असल्याने मधला मारुती, टिळक चौक, कोतम चौक, माणिक चौक व मंगळवार पेठ पोलीस चौकी परिसरात पूजेचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी व अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

बंद कालावधी : दि. १३/०९/२०२६ रोजी सकाळी ०८.०० वा. पासून ते दि. १५/०९/२०२६ रोजी रात्री २४.०० वा. पर्यंत.

कोणते मार्ग बंद राहणार? (दुचाकी, तीन चाकी, चार चाकी सर्व प्रवासी वाहनांसाठी)

मार्ग : टिळक चौक, मधला मारुती, कोतम चौक, माणिक चौक व मंगळवार पेठ पोलीस चौकी

(पोलीस खात्याची वाहने, इतर खात्यांची अत्यावश्यक सेवेची व पोलीस ज्या वाहनांस परवानगी देतील अशी वाहने वगळून)

पर्यायी मार्ग कोणता?

बालीवेस, माणिक चौक, कोतम चौक व मंगळवार पेठ पोलीस चौकीकडून जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग –

मार्ग : बालीवेस, बीएसएनएल ऑफिस, मंगळवार पेठ पोलीस चौकी, कुंभार वेस ते कोतम चौक तसेच टिळक चौक, जुनी कसबा पोलीस चौकी, माणिक चौक या मार्गाचा अवलंब करावा.

सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel