“तू मेरे भाभी को मेसेज क्यू करता” म्हणत एका तरुणावर कोयताने हल्ला..!

*भाभीला मेसेज का करतोस म्हणत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; मार्कंडेय मंदिराजवळ थरार*
*सोलापूर (दि. १४ सप्टेंबर) –* “तू मेरे भाभी को मेसेज क्यू करता” या कारणावरून एका तरुणावर कोयता आणि बर्फ फोडण्याच्या टोच्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मार्कंडेय मंदिराजवळ घडली आहे. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत.
*पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार –*
• *पोलीस ठाणे –* फौजदार चावडी पोलीस ठाणे
• *गुन्हा नंबर व कलम –* ७०४/२०२६, भा.न्या.संहिता कलम ११८(२), ३(५), भा.ह.का.क. ४/२५ प्रमाणे
• *घटना घडली –* दि. १३/०९/२०२६ रोजी सकाळी ०९.०० वा. सुमारास, मार्कंडेय मंदिर जवळ, सोलापूर
• *गुन्हा दाखल –* दि. १४/०९/२०२६ रोजी १७.०३ वा.
• *फिर्यादी –* तालीब सादिक कुरेशी (वय २०, रा. मुल्लाबाबा टेकडी, विजापूर वेस, सोलापूर)
• *आरोपी –* १) रियान कुरेशी, २) समीर कुरेशी, ३) साहिल कुरेशी, ४) एक अनोळखी इसम
*नेमके काय घडले?*
फिर्यादी तालीब कुरेशी यांचा मित्र असलेला आरोपी क्र. १ रियान कुरेशी याने फोन करून “तुला जरा बोलायचे आहे, तू मार्कंडेय मंदिराजवळ ये” म्हणून बोलावले.
फिर्यादी त्याचा मित्र मुजाहिद बागवान याच्यासोबत दुचाकीवरून तेथे गेला असता, तिथे ओळखीचे आरोपी क्र. १ ते ३ आणि एक अनोळखी इसम थांबलेले होते.
फिर्यादी गाडी लावून त्यांच्याजवळ गेला असता, आरोपी क्र. २ समीर कुरेशी याने “तु मेरे भाभी को मैसेज क्यु करता” असे म्हणत पोटात लपवलेला कोयता काढून फिर्यादीच्या मानेवर वार केला.
फिर्यादीने बचावासाठी डावा हात मध्ये घातल्याने कोयता कानाला आणि डाव्या हाताच्या तळव्याला लागून तो जखमी झाला. त्याचवेळी आरोपी क्र. ४ याने फिर्यादीला धरून ठेवले आणि आरोपी क्र. ३ साहिल कुरेशी याने त्याच्याकडील बर्फ फोडण्याचा टोचा फिर्यादीच्या पाठीत मारून जखमी केले.
हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या मुजाहिद बागवान याच्या तोंडावर आरोपी क्र. २ याने कोयत्याने वार करून त्यालाही जखमी केले आणि सर्व आरोपी तेथून पळून गेले.
त्याचवेळी तेथून जात असलेला फिर्यादीचा मित्र सोनु कुरेशी याने जखमींना पाहून तातडीने दुचाकीवरून सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.
या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत…



