सोलापूर- घरात घुसून बॅगेतून 2 लाख 86 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास..!

सोलापूर (दि. २१) – राहत्या घरात प्रवेश करून व्हॅनिटी बॅगमधून २ लाख ८६ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना सैफूल परिसरात घडली आहे.
गु.र.नं. ५३३/२०२६ – भा.न्या.संहिता कलम ३०५(ए) प्रमाणे.
घटना – ०७/०९/२०२६ रोजी ०९.०० वा ते २१.०० वा चे दरम्यान, सैफुल, सोलापूर
गुन्हा दाखल वेळ – दि २१/०९/२०२६ रोजी १२.४८ वा.
फिर्यादीचे नाव – हेमलता कृष्णकुमार लकूरी, वय- ६३ वर्षे, रा. घर नं. २७, कित्तुर चन्नम्मा नगर, सोलापूर
आरोपीचे नाव – अज्ञात चोरटा
गेला माल – २,८६,५००/- रु त्यात २ तोळे वजनाचे चैन, ६ तोळे वजनाचे अशोक हारताळा, ८ ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस, २ ग्रॅम चैन, ३ तोळेचे बाजुबंद असे
हकीकत अशी की, वरील वेळी व ठिकाणी, यातील फिर्यादीच्या राहत्या घरात कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन फिर्यादीची व्हॅनिटी बॅग मधुन नमुद वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे दागिने मुद्दाम लबाडीने चोरुन नेले आहे म्हणून.
या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत…



