सोलापूर राजकीयsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रराजकीयसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

SIR विरोधात सोलापुरात एल्गार! १३ कोटी नावे वगळल्याचा युवा महासंघाचा आरोप; जिलाधिकारी कार्यालयात ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याचे दहन!

सोलापूर, दि. १० : विशेष सखोल मतदार पुनरावलोकन (SIR) प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करावीत आणि मतदानाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवावा, या मागण्यांसाठी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले.

युवा महासंघाचे चे राज्य सचिव दत्ता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम यांनी, “मतदारांची नावे वगळून लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा दिला.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा प्रतीकात्मक पुतळा आणून त्याचे दहन केले. यावेळी “SIR प्रक्रिया रद्द करा”, “वगळलेल्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट करा”, “लोकशाही वाचलीच पाहिजे”, “संविधान जिंदाबाद”, “ज्ञानेश कुमार मुर्दाबाद”, “मोदी-शहा मुर्दाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या.

SIR प्रक्रियेमुळे १३ कोटी नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळल्याचा आरोप युवा महासंघाने केला. मतदार यादीच्या पुनरावलोकनासाठी किमान दोन महिन्यांची मुदत द्यावी, प्रक्रिया पारदर्शक व लोकशाही पद्धतीने राबवावी आणि निवडणूक आयोगाची स्वायत्तता व विश्वासार्हता पुनर्स्थापित करावी, अशी मागणी करण्यात आली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावे तसेच निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीत पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली.

सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि तरुणांवरील लाठीचार्जचा निषेध करत, मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा महासंघाने दिला.

आंदोलनात युवा महासंघाचे राज्य समिती सदस्य बालकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, बालाजी गुंडे, मधुकर चिल्लाल, अमित मंचले, अभिजित निकंबे, बजरंग गायकवाड, राहुल बुगले, प्रदीप मरेड्डी, प्रशांत विटे, शिवा श्रीराम, विजय साबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel