घराच्या वादातून रक्तरंजित हाणामारी – चुलत्याकडून पुतणीच्या डोक्यात वीट घालून वार, आई-भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण!

सोलापूर : लक्ष्मी पेठ, बॉबी चौक, आमराई जवळ घराच्या वादातून चुलत्यानेच आपल्या पुतणीवर आणि तिच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. घर आमचे आहे, तुम्हाला राहू देत नाही, खल्लास करतो अशी धमकी देत विटेने डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाणे – गु.र.नं. ७८४/२०२६
भा. न्या. सं. कलम ११८(१), ११५(२), ३५१(३), ३५२, ३(५) प्रमाणे गंभीर गुन्हा.
फिर्यादी :- ऐश्वर्या सुर्यकांत रासेराव, वय-२५ वर्षे, रा. घरनं ९७/९८/९९ लक्ष्मी पेठ बॉबी चौक आमराई जवळ सोलापूर
आरोपी :- १) नंदकुमार रासेराव २) रोहन रासेराव ३) जोशना रासेराव सर्व रा. लक्ष्मी पेठ बॉबी चौक आमराई जवळ सोलापूर
रक्तरंजित हकीकत अशी की –
दि. २३/१०/२०२६ रोजी रात्री २१.०० वा. चे सुमारास, घरनं ९७/९८/९९ लक्ष्मी पेठ बॉबी चौक आमराई जवळ सोलापूर येथे, फिर्यादीचे चुलते यातील अरोपीत क्रं. १ यांनी मागील भांडणाच्या कारणावरून फिर्यादीचा भाऊ तुषार यास पकडून “आमच्या विरुद्ध पोलीस तक्रार केली का, हे घर आमचे आहे तुम्हाला राहू देत नाही, तुम्हाला खल्लास करतो” अशी धमकी दिली.
“भाऊ तुषार यास अंगात जास्त मस्ती आहे” असे म्हणून शिव्या देऊन फिर्यादीस व फिर्यादीच्या आईस हाताने व लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. तसेच आरोपीत क्रं. ३ यांनी फिर्यादीचे आईस मारहाण करून आरोपी क्रं. २ याने विट घेऊन फिर्यादीचे डोक्यावर डाव्या बाजूस मारून गंभीर जखमी केले आहे.
घराच्या वादातून स्वतःच्याच रक्ताच्या नात्यावर विटेने वार करणाऱ्या या नराधम चुलत्यांचा हा प्रकार अत्यंत क्रूर असून या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
तपास :- पोह/१३८४/कसबे- हे करीत आहेत.



