सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

बहुजन शिक्षक महासंघाच्या मंचकावर रंगला गुणवंतांचा कौटुंबिक सन्मान सोहळा अन् ‘संघर्षगाथा’ स्मरणिका व मनाच्या गाभाऱ्यातून.. लोगोचे प्रकाशन….

आज इंग्रजी भाषेचे अवास्तव महत्त्व वाढल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे प्रमाण वाढले असून मराठी शाळेची दुरावस्था होत आहे. परिणामी अनेक मराठी शाळा बंद पडत आहेत. अशा कठीण प्रसंगी शिक्षक मराठी शाळा टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या प्रयत्नांना शासनाने पाठबळ द्यावे असे सांगून डॉ. निर्मलकुमार फडकुले हे शिक्षक होते त्यांच्या नावाच्या सभागृहामध्ये शिक्षकांचा सन्मान होत आहे. याबद्दल महासंघाचे त्यांनी कौतुक केले.

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या अकराव्या जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार, शिक्षक व कर्मचारी पुरस्कार वितरण करतेवेळी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलगुरू डॉ…… शिंदे, जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे, सेवानिवृत्त विस्ताराधिकारी रावसाहेब भालेराव, प्राचार्य अशितोष शहा, डॉ. बापूसाहेब आडसूळ, महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर जिल्हा सचिव रवी देवकर यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करून घेतले.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर म्हणाले, बहुजन शिक्षक महासंघाचा हा पुरस्कार म्हणजे सत्कारमूर्तींनी शाळेत अध्यापन करताना राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि डिजिटल शिक्षणाच्या योगदानाचा जिल्हा स्तरावरील गौरव आहे असे सांगत महासंघ या पुढील काळातही अन्याग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यापक चळवळ उभी करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ शिवाजी शिंदे, उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे तसेच सत्कारमूर्तींच्या वतीने प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले यांनी केले तर निर्मला मौळे यांनी आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रफुल्ल जानराव, दत्तात्रय शिंदे, नितीन गायकवाड, दाउत आतार, प्रा. अभिजित भंडारे, प्रकाश साळवे, गंगाधर शिवशरण, चंद्रमणी वाघमारे, प्रा युवराज भोसले,मल्लिकार्जुन कांबळे, इन्नुस बाळगी, विष्णू लादे, सदानंद कोळी, तानाजी बंडगर आदींनी परिश्रम घेतले.

सत्कार समारंभात प्रारंभी महासंघाच्यावतीने ‘संघर्षगाथा’ या स्मरणिकेचे प्रकाशन आणि महासंघाचे जिल्हा सचिव तथा शिक्षक- पत्रकार रवी देवकर यांच्या ‘मनाच्या गाभाऱ्यातून..!’ या लोगोचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी समर्पक असे उत्कृष्ट लोगो तयार करणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम चित्रकार विठ्ठल मोरे यांचा प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. यानंतर शाळेतून सेवानिवृत्त झालेले महासंघाचे सभासद राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, बलभीम हांडे, सावकार कारंडे, यल्लाप्पा पुटगे, तुकाराम चौरे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. त्यानंतर 16 सत्कारमूर्तींचा सन्मान करण्यात आला यामध्ये..

यांना सन्मानचिन्ह, शाल, बुके व ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel