सोलापूर बातमी

खासदार प्रणिती शिंदे यांचे सोलापूर विद्यापीठ कुलगुरू यांना निवेदन…काय प्रकरण आहे पहा…

सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे विद्याथ्यांसमोर निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांचे सोलापूर विद्यापीठ कुलगुरू यांना निवेदन

सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेल्या विविध समस्या

१) आक्टोबर/नोव्हेंबर २०२५ च्या विद्यापीठ परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी विद्यापीठाने ३०/०९/२०२५ पर्यंत मुदत दिली आहे. दरम्यानच्या काळात सोलापूर जिल्ह्यामधील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे आजपर्यंत फक्त २०% ते २५ टक्के विद्यार्थी परीक्षेचे फॉर्म भरू शकले आहेत. सदरील परिस्थितीमध्ये विद्यापीठ परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी कोणतेही विलंब शुल्क न आकारता दि. १५/१०/२०२५ रोजीपर्यंत मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे.कोणताही विद्यार्थी परीक्षेचे फॉर्म भरण्यापासून वंचित राहू नये

२) जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती विचारात घेवून सध्याचे थेअरी व प्रात्यक्षिक परीक्षा वेळापत्रक रद्द करुन सदर परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे.

३) अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था पूर्ण विस्कळीत झाली आहे. त्यामुळे यावावत आपण
आपत्ती व्यवस्थापन कक्ष, सोलापूर जिल्हा यांच्या निर्देशानुसार वेळोवेळी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

४) बहुतांश विद्यार्थ्यांच्या कुटुंबासमोर गंभीर आर्थिक व दैनंदिन समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षा शुल्क माफ करणेसाठी शासनाकडे विशेष प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे.

५) सध्या सुरु असलेल्या विद्यापीठ प्रात्यक्षिक परीक्षा तात्काळ स्थगित करून त्या परीक्षा परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतरच घेण्यावावत स्पष्ठ निर्देश होणे आवश्यक आहे.

6) पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सव स्थगित करून तो खर्च पूरग्रस्त, शेतकरी कुटूंबाना द्यावा.
जिल्ह्यातील 90 पेक्षा अनेक गावं पुरामुळे बाधित झालेत. शेकडो हेक्टर हेक्टर क्षेत्रातील पिकं उध्वस्त झालीत, 450 शाळा, महाविद्यालयात पाणी शिरले आहे, काहींची घर पाण्यात अडकली, अनेकांचे संसार उघड्यावर पडते. अशा नैसर्गिक आपत्ती मध्ये शेतकरी कुटुंब बाधित झाले असताना विद्यापीठाचा युवा महोत्सव घेणे त्यावर 14 लाख रुपये होणारा खर्च संयुक्तिक नाही. त्यामुळे युवा महोत्सव स्थगित करावा अथवा गावे दत्तक घेऊन त्या गावांचे पुनर्वसन बाबत साहाय्यत्ता करावे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत पूरग्रस्त शेतकरी, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांना द्यावे.

यावेळी सोलापूर युवक कॉंग्रेस अध्यक्ष व विद्यापीठ सिनेट सदस्य गणेश डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष मयूर खरात,युवा नेते रूपेश गायकवाड, महेश लोंढे, सुनिल सारंगी, शुभम माने, आशुतोष वाले, महेंद्र शिंदे, आदित्य म्हमाणे,आकाश नाईक,रिहान शेख उपस्थितीत होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login