राजकीय

उद्धव ठाकरे, राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का? -एकनाथ शिंदे

बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या थोबाडात मारली होती. तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला. तसेच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फक्त एक दिवस सेल्युलर तुरुंगात राहून दाखवावे, असे आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. राहुल गांधींच्या निषेधार्थ सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तालुके, विधानसभा मतदारसंघ, जिल्हे, गावागावातून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढली जाईल, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, सावरकरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना झाली. स्वातंत्र्यवीरांच्या संघर्षामुळे आपण आज स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. ज्या देशभक्तांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांचा वारंवार जाणीवपूर्वक अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सावरकरांचा अवमान करणाऱ्या वृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांची निंदा करतो. सावरकर हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे दैवत आहे. आणि हिंदुत्व हिंदुत्व म्हणणाऱ्या एकाही नेत्याने विधानसभेत याचा निषेध केला नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

शिंदे म्हणाले की, सावरकर अंदमानातील ज्या तुरुंगात राहिले, तिथे जर राहुल गांधी एक दिवस राहून आले तर त्यांना याची जाणीव होईल. त्याचा निषेध सर्वांनी करायला हवा होता. पण ज्यांनी त्यांचा अवमान केला, ते वारंवार सांगत आहेत. मी सावरकर नाही गांधी आहे. सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. सावरकर व्हायला जेवढा त्याग व प्रेम असायला हवे ते तुमच्यात नाही. तुम्ही परदेशात जाऊन देशाची निंदा करता. यापेक्षा जास्त दुर्दैव काय असू शकते.

सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही हे बोलणारे नेते, त्यांचे आमदार विधानसभेच्या अधिवेशनात मूग गिळून गप्प होते. कशासाठी, राजकारणासाठी, महाविकास आघाडीसाठी. सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही म्हणजे काय करणार, असा सवाल त्यांनी केला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel