महाराष्ट्र

अयोध्येच्या राम मंदिरासाठी पाकिस्तानमधून आली खास वस्तू, पुजेसाठी वापरली जाणार!

योध्या : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सामील होण्यासाठी अयोध्येत पोहोचतील. त्याआधी 17 जानेवारी म्हणजेच आजपासून अयोध्येत प्राण प्रतिष्ठेआधीचे अनुष्ठान सुरू झाले आहेत, त्यानिमित्त अयोध्येमध्ये कलश यात्रेचं आयोजन केलं गेलं होतं, यात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

राम मंदिरात होणाऱ्या पुजेसाठी देशातल्या वेगवेगळ्या भागातून साधन सामग्री पोहोचत आहे. तर नेपाळमधूनही राम मंदिरासाठी उपहार आले आहेत. पाकिस्तानमधून राम मंदिराच्या पुजेसाठी खास वस्तू आली आहे.
अयोध्येत रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठेनंतर भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था केली जाणार आहे. पूजेनंतर रामलल्लांना नैवेद्य दाखवला जाईल. हा नैवेद्य बनवताना पाकिस्तानातून आलेल्या वस्तूचा वापर होणार आहे. रामलल्लांचा नैवेद्य बनवताना त्यात सैंधव मीठाचा वापर केला जाणार आहे. जगभरामध्ये सैंधव मीठ हे फक्त पाकिस्तानमध्येच मिळतं. एका करारानुसार स्वातंत्र्यानंतरही हे मीठ सातत्याने भारतात येतं.
50 च्या दशकात झाला करार
हिंदू धर्मात कोणतंही व्रत केल्यानंतरच्या नैवेद्यात सैंधव मिठाचा वापर केला जातो. या मीठाबद्दल भारतामध्ये धार्मिक मान्यता आहे. या मीठाशिवाय सण, उत्सव, पूजा यासाठी असलेला नैवेद्य तयार होत नाही. हे मीठ कायमच पाकिस्तानमधून भारतात येतं. सैंधव मिठाला रॉक सॉल्ट, हिमालयन पिंक सॉल्ट किंवा लाहोरी मीठही म्हणतात. पाकिस्तानसोबतचे संबंध खराब झाल्याचा परिणाम दोन्ही देशांमधल्या व्यापारावर झाला आहे, त्यानंतरही हे मीठ भारतात येतं. 50 च्या दशकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात करार झाला, ज्यात सैंधव मीठ कोणत्याही अडथळ्याशिवाय भारतात येईल, असं दोन्ही देशांकडून मान्य केलं गेलं.
देश-विदेशातून आलं साहित्य
प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर प्रभू श्रीरामांसाठी देश-विदेशातून आलेला नैवेद्य ठेवला जाईल. यात बनारसच्या 151 पानांच्या नैवेद्याचा समावेश आहे. याशिवाय बनारसची एक हजार अतिरिक्त पानही ठेवली जातील, जी भक्तांना वाटण्यात येतील. प्राण प्रतिष्ठेच्या शुभ मुहुर्तावर चंढीगडमध्ये 125 क्विंटल शुद्ध देशी तुपातले लाडू बनवण्याचं काम सुरू आहे. रामलल्लांच्या नैवेद्यासाठी आग्र्याचा पेठा, जयपूरचं तूप आणि छत्तीसगडहून तूपही येणार आहे. अयोध्येमध्ये रामलल्लांना 56 प्रकाराचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. तसंच देश-विदेशातून मिठाई आणि फुलंही पाठवली जात आहेत.
रामलल्लांसाठी बनवण्यात येणाऱ्या 56 प्रकारच्या नैवेद्यांमध्ये पाकिस्तानमधून आलेल्या लाहोरी मिठाचा वापर होणार आहे. सैंधव मीठ 2 रुपये किलोच्या दराने भारतात येतं, यावर 200 टक्के ड्युटी लावल्यानंतर भारतातल्या व्यापाऱ्यांना हे मीठ 6 रुपये किलोने मिळतं. यानंतर सैंधव मीठावर भारतात प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि डिस्ट्रीब्यूशन केलं जातं. सैंधव मीठामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळतं, त्यामुळे हे मीठ आरोग्यासाठी चांगलं असतं.
कुठे आहे सैंधव मीठाची खाण?
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून येत असल्यामुळे या मीठाला सैंधव मीठ म्हणलं जातं. पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर पंजाबमध्ये कोह नावाच्या पहाडी भागात सैंधव मीठ आढळतं. या पहाडी भागात खेवडा मीठ खाण आहे, जी जगभरातली मीठाची दुसरी मोठी खाण आहे. ओनटारियोमधली सिफ्टो कॅनडा सॉल्ट माइन्स आहे. खेवडा मीठ खाणीतून प्रत्येक वर्षी 4.60 लाख टन पेक्षा जास्त मीठ काढलं जातं. या खाणीत पुढची 500 वर्ष पुरेल एवढा मीठाचा साठा असल्याचं सांगितलं जातं.
खेवडा मीठ खाणीमध्ये 40 किमी लांब सुरूंग आहे, यातून निघणारं मीठ पूर्ण उत्तर भारतीय उपखंडात वापरलं जातं. भारतात सैंधव मीठ हिमाचल प्रदेश आणि राजस्थानच्या सांभर झील भागात मिळतं, पण याचं प्रमाण अत्यल्प आहे. सैंधव मीठ भारतीय जेवण आणि औषधांमध्ये वापरलं जातं. हे मीठ रंगहीन, पांढरं किंवा गुलाबी रंगाचं असतं.
खेवडा मीठ खाण पाकिस्तानच्या पंजाब भागात झेलम जिल्ह्यात इस्लामाबादपासून 160 किमी अंतरावर आहे. खेवडा मीठ खाण 19 मजली खोल आहे. तर या खाणीतल्या सुरूंगांची खोली जवळपास 730 मीटर लांब आहे. अलेक्झांडरने जेव्हा खेवडावर हल्ला केला तेव्हा त्याच्या घोड्यांनी भिंती चाटायला सुरूवात केली, यानंतर इथे मीठाची खाण असल्याचं समजलं.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login