महाराष्ट्र

राहुल नार्वेकरांचा दावा पुराव्यासह फेटाळला; अनिल परबांचं लाव रे तो व्हिडिओ

मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा दावा नार्वेकर यांनी फेटाळला असून एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला.

हा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने आज जनता न्यायालय घेत आपली बाजू लोकांसमोर मांडली. यामध्ये पक्षाचे नेते आणि वकील अनिल परब यांनी लाव रे व्हिडीओ म्हणत शिवसेना पक्षात झालेल्या घटनादुरुस्तीचे पुरावेच दिले.

पुरावे देत नार्वेकर यांचा दावा फेटाळला
1999 नंतर शिवसेना पक्षात कोणतीही घटना दुरुस्ती झालेली नाही, असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला होता. मात्र, हे चुकीचं असून याचा व्हिडीओच्या माध्यमातून पुरावाच शिवसेना नेते अनिल परब यांनी दिला. परब म्हणाले, की 2013 च्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घटनादुरुस्तीचे ठराव मांडले गेले. पक्षप्रमुख पद गोठवण्यात यावं हा पहिला ठराव होता. शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण करण्यात येत आहे, त्यांची निवड प्रतिनिधीसभा करेल, हा दुसरा ठराव. कार्यकारी अध्यक्षपद रद्द करण्यात येत आहे, हा तिसरा ठराव. शिवसेना प्रमुखांचे अधिकार पक्षप्रमुखांकडे देण्यात येतील, तसंच राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा संपूर्ण अधिकार पक्षप्रमुखांकडे असतील, हा तिसरा ठराव होता. ही घटनादुरुस्ती आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.

काय म्हणाले अनिल परब?
गेले दीड वर्ष सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडत होते. त्याने 16 गद्दार अपात्र होतील संपूर्ण देशाला वाटलं होतं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं, आम्ही निकालाची चौकट बनवतो आणि त्या चौकटीच्या आधारावर अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सांगितलं होतं. निवडणूक आयोगाने 1999 च्या घटनेन्नतर निवडणूक आयोगाकडे नोंद नाही असं सांगितलं. यामुळे 1999 पूर्वी बाळासाहेबांची शिवसेना होती. त्यानंतरची नोंद नसल्याने हा निर्णय दिला असल्याचा नार्वेकरांनी सांगितलं. शिवसेनेने केलेले पाचही ठराव अनिल परब यांनी वाचून दाखविले. शिवसेनेनं मांडलेल्या ठरावाच्या वेळी राहुल नार्वेकर आणि राहुल शेवाळे उपस्थित असल्याचे व्हिडिओ यावेळी दाखवण्यात आले.

यामध्ये ठरावाचे व्हिडिओ दाखवण्यात आले. शिवसेना प्रमुख पद गोठवण्यात आल्याचा पहिला ठराव मंजूर करण्यात आला. शिवसेना प्रमुख पद फक्त बाळासाहेबांचं आहे. दुसरा ठराव.. रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्याचा ठराव मांडला.

राहुल नार्वेकरही देणार पत्रकार परिषदेतून उत्तर
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांना उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली आहे. ठाकरेंच्या परिषदेनंतर 5 वाजता नार्वेकरांची पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेत ठाकरेंच्या आरोपांना नार्वेकर उत्तर देणार असल्याची माहिती मिळत आहे.

नार्वेकरांच्या विरोधात शिंदे गटही हायकोर्टात
सोमवारी उद्धव ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील मुंबई हायकोर्टात धाव घेत नार्वेकरांच्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात याचिका दाखल केली आहे. यामध्ये नार्वेकरांनी ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यास नकार दिल्याच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे. त्यांना अपात्र का केलं नाही, असा सवाल त्यांनी याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे. तर आम्ही मूळ शिवसेना नसतानाही आम्हाला अपात्र का केलं नाही? असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia